नाशिक : ‘स्वच्छ भारत अभियान’च्या संकल्पनेप्रमाणेच सोशल मीडिया शुद्ध करण्यासाठी आणि मानवतेला अशुद्धता व धमक्यांतून बाहेर काढून टाकणे काळाची गरज बनली आहे. भारतीय सायबर कायद्यानुसार कोणतीही धोकादायक माहिती पोस्ट करणे हा गुन्हा आहे.आजच्या काळात सायबर बुल्ािंग, सायबर स्टॉकिंग, इंटरनेट ट्रॉल्ािंग, अपमान, अश्लील पोस्ट, लहान मुलांचे शोषण सोशल माध्यमातून केले जात आहे. तर काहीवेळा सोशल मीडियावरील खाते किंवा अकाउंटमधून ओळख करून देणाऱ्या माहितीची चोरी केली जाते. सामूहिक अनागोंदीमुळे कधी दंगल होते तर काहीवेळा एखाद्या समूहामध्ये भयाची भावना निर्माण होते. त्यामुळे अशा पोस्ट काढून टाकण्यासाठी किंवा लोकांची प्रतिष्ठा आणि माणुसकीची सुरक्षा करण्यासाठी सायबर क्राइम नाशिकच्या वतीने सोशल मीडिया शुद्धीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांच्या मार्गदर्शनानुसार ई-स्वयंसेवक म्हणून सोशल मीडियामधील अशा सर्व त्रासदायक, बनावट आणि संवेदनशील सामग्री काढून टाकण्यासाठी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. फेसबुकसारख्या सामाजिक नेटवर्ककडे या पोस्ट काढून टाकण्यासाठी काही समुदाय मार्गदर्शक आहेत. त्यामुळे सायबर क्राइम नाशिकच्या वतीने कळविलेल्या १०० हून अधिक त्रासदायक पोस्टवर गेल्या दोन दिवसांत फेसबुकने कारवाई केली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या समाजाला धोकादायक ठरणाºया पोस्टवर सायबर क्राइमची करडी नजर राहणार आहे.मोहिमेची गरज का?सोशल मीडियावर छळ होणाºया पीडित बळींचा अप्रत्यक्षपणे फायदा होईल.हे करून, आम्ही सायबर गुन्ह्यांचा दर कमी करणार आहे.जगभरात सध्या २.३८ अब्ज फेसबुक वापरकर्ते आणि त्यातील भारतातील ३०० दशलक्ष वापरकर्ते आहेत आणि बºयाच वापरकर्त्यांमध्ये दुसºयाचे शोधून काढलेले फोटो, व्हिडीयो पहायला मिळतात. त्यामुळे अशा वापरकर्त्यांना आळा बसेल.यामध्ये काय केले जाईल?चुकीच्या जाहिराती किंवा माहितीमुळे व्यत्यय आणणारी पोस्ट, बनावट खाती काढणारी व्यक्ती यांना सोशल मीडियावर प्रतिबंधित केले जाईल.हिंसा आणि अपराधिक वर्तणूक, आत्महत्या आणि स्वत:ची दुखापत, बालनग्नता आणि अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, सायबर धमकावणी आणि छळ, प्रादेशिक प्रेम, जात संबंधित पोस्ट, ग्राफिक सामग्रीच्या हिंसा, स्पॅम क्रियाकलाप आणि खोट्या बातम्या यावर आळा बसेल.
आता होणार सोशल मीडियाच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:42 PM
‘स्वच्छ भारत अभियान’च्या संकल्पनेप्रमाणेच सोशल मीडिया शुद्ध करण्यासाठी आणि मानवतेला अशुद्धता व धमक्यांतून बाहेर काढून टाकणे काळाची गरज बनली आहे. भारतीय सायबर कायद्यानुसार कोणतीही धोकादायक माहिती पोस्ट करणे हा गुन्हा आहे.
ठळक मुद्देसायबर क्राइम : धोकादायक पोस्टवर नजर; कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो