मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा बंद ठेवून प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत ५ पटीने वाढविली होती. आता सर्व रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर ५० रुपयांऐवजी दहा रुपयांत प्लॅटफॉर्म तिकीट प्रवाशांना मिळणार आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता उन्हाळ्याच्या मोसमात प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्याचे पाऊल उचलले होते. कोविड महामारीमुळे सर्व स्थानकावर प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नसली तरी रेल्वे प्रशासनाच्या सूचनेनुसार भुसावळ विभागातील मनमाडसह नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा या नामांकित रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट देण्याचे सुरू केले होते. ज्याचे मूल्य ५० रुपये ठेवण्यात आले होते . त्यामुळे नातेवाईक किंवा आप्तेष्ट व्यक्तींना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जाणाऱ्या व्यक्ती ना प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच पैसे मोजावे लागत होते. या तिकिटांची वैधता दोन तासांपर्यंत असते. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची सुविधा दिनांक ११ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत दहा रुपये असेल. प्रवाशांना रेल्वे स्थानकावर व गंतव्यस्थानावर कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. (१० मनमाड)
===Photopath===
100621\10nsk_24_10062021_13.jpg
===Caption===
१० मनमाड