नाशिक : आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर राज्य शासनाच्या जाहिराती असल्याने या जाहिराती आता काढून घेण्यात आल्या आहेत. मात्र अशा जाहिराती काढून घेताना बसेसचे नुकसान झाल्याने सदर नुकसान संबंधित ठेकेदाराकडून वसूल केले जाणार असून, यासाठी विभागातील नुकसान झालेल्या बसेसची मोजदाद सुरू झाली आहे. प्रत्येक डेपोत किमान चार ते पाच गाड्यांचे तरी नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही राज्य परिवहन महमंडळाच्या नाशिक विभागातील बसेसवर राज्य शासनाच्या योजनांच्या जाहिराती झळकत होत्या. याबाबत माध्यमांकडून आचारसंहिता भंग होत असल्याबाबतचे वृत्त दिल्यानंतर परिवहन महामंडळाने लागलीच राज्यातील सर्व बसेसवरील जाहिराती तत्काळ काढण्याचे आदेश विभागीय एस. टी. महामंडळांना पाठविले होते. त्यानुसार नाशिक विभागातील सर्व डेपोमधील बसेसवरील जाहिराती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. महामंडळातील कर्मचाऱ्यांनाच या जाहिराती काढण्याचे काम देण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत बसेसवरील जाहिराती काढून घेतल्या आहेत. मात्र जाहिराती काढून घेताना बससेवरील रंग उडाल्याने याचा खर्च संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार आहे.बसेसचे विद्रुपीकरण झाल्यामुळे त्याची भरपाई मिळविण्यासाठी अशाप्रकारच्या बसेसेची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. नाशिकमध्ये १३ डेपो व्यवस्थापकांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक डेपोकडून नुकसानग्रस्त बसेसची माहिती गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने नाशिक विभागीय कार्यालयाला पाठविलेल्या पत्रानुसार विभागातील डेपो व्यवस्थापकांकडून याबाबतची माहिती जाणून घेतली जात आहे.
बसेस विद्रुपीकरणाची मोजदाद सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:26 PM
नाशिक : आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर राज्य शासनाच्या जाहिराती असल्याने या जाहिराती आता काढून घेण्यात आल्या ...
ठळक मुद्देभरपाईचा दावा : बसेसवरील जाहिराती काढताना नुकसान