नाशिक: जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाला सुरूवात झाली नसली तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या झळा काहीशा कमी झाल्या आहेत. जूनच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात ५६ टँकर्स सुरू होते आता केवळ ४० टॅकर्स सुरू असून येत्या काही दिवसात यातील अनेक टँकर्सची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.वरुणराजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्याला सलग दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसलेल्या नाहीत. मागीलवर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे धरणांसह विहीरीही तुडूंब झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य फारसे जाणवले नाही. मात्र मे-जून या दोन महिन्यांत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर्सची मागणी वाढल्याने जूनच्या मध्यापर्यंत ६० पेक्षा अधिक गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. मान्सुनच्या आगमनापर्यंत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणी साठा असल्यामुळे एप्रिलपर्यंत जिल्ह्यात पाण्याची अडचण निर्माण झाली नाही. पाण्याचा पुरेसा साठा असल्याने नियमित आवर्तन सोडण्याची देखील वेळ आली नाही. .जुनच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्याने टँकर्स सुरू असलेल्या गावांना दिलासा मिळाला आहे. आता जिल्ह्यातील टँकर्सची मागणी १६ ने घटली असून सद्यस्थितीत ४० टँकर्सच सुरू आहेत. बागलाण तालुक्यात ६, चांदवड ४, देवळा ३, मालेगाव, ५, नांदगाव १, पेठ ७, सुरगाणा ५, तर येवला येथे ९ टँकर्स सुरू आहेत.
पावसाच्या आगमनाने पाण्याच्या टँकर्सची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 17:01 IST
नाशिक: जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाला सुरूवात झाली नसली तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या झळा काहीशा कमी झाल्या ...
पावसाच्या आगमनाने पाण्याच्या टँकर्सची संख्या घटली
ठळक मुद्देदिलादायक: टँकर्सची मागणी आणखी घटण्याची शक्यताअनेक टँकर्सची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता