नाशिक: मोदी सरकार गेल्या चार वर्षांपासून सवर्णांच्या आरक्षणावर काम करीत होते. संसदेत तो आता मांडण्यात आला असला तरी या निर्णयाचा निवडणुकीशी कोणताही संबध नसल्याचा दावा करतांनाच सवर्णांना आरक्षण मिळाल्याचा आनंदच असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी केले.नाशिकमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी सीमा आठवले आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आठवले यांचे चिरंजीव जीत आठवले देखील त्यांच्या सोबत होते. आार्थिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा विचार आगोदरपासूनच सुरू होता. या संदर्भातील सोपस्कर पुर्ण झाल्यानंतर तो आता मांडण्यात आला आहे. या निर्णयाचा संबंध निवडणुकीशी लावता कामा नये असे आठवले यांनी यावेळी सांगितले.रामदास आठवले यांनी आरक्षणाबाबत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. केंद्रात देखील त्यांनी अनेकदा आरक्षणाचा मुद्या मांडलेला आहे. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याबाबतत आठवले यांची भूमिका देखील महत्वाची असल्याचे सीमा आठवले यांनी सांगितले. मराठा आरक्षणावर काही दलित संघटना न्यायालयात गेल्या असल्या तरी मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणतीही अडचण येणार नसल्याचेही आठवले म्हणाल्या.
आर्थिक निकषावरील आरक्षणाचा आनंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 5:13 PM
नाशिक : मोदी सरकार गेल्या चार वर्षांपासून सवर्णांच्या आरक्षणावर काम करीत होते. संसदेत तो आता मांडण्यात आला असला तरी ...
ठळक मुद्देसीमा आठवले : चार वर्षापासूनच आरक्षणावर काम