नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या जनता दरबारात नागरिकांनी आपले गाऱ्हाणे निवेदनांच्या माध्यमातून मांडले. विविध खात्यांशी संबंधित तसेच प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भातील निवेदने जनता दरबारात नागरिकांनी मांडली. स्थानिक पातळीवरील प्रश्न तत्काळ सोडविण्याला प्राधान्य देण्यात आल्यामुळे तक्रारकर्त्यांनाही दिलासा मिळाला.राष्ट्रवादी कँग्रेसच्या वतीने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार संकल्पना राबविली जाते. या जनता दरबार उपक्रमात अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी पालकमंत्र्यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. सुमारे ५० ते ६० नागरिकांनी निवेदनासह उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या. काही नागरिकांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी काही महत्त्वाच्या प्रश्नांवरदेखील चर्चा केल्याचे कळते.नागरिकांनी जनता दरबारात मांडलेल्या समस्या जाणून घेत त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी संंबधित विभागाने योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करण्यासाठी निवेदने पुढे पाठविण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात मांडले गाऱ्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 4:36 PM
राष्ट्रवादी कँग्रेसच्या वतीने जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार संकल्पना राबविली जाते. या जनता दरबार उपक्रमात अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
ठळक मुद्देनिवेदने सादर : संबधित विभागांचे वेधले लक्ष