ग्राहकांच्या तक्रारी : महावितरणकडून दुरुस्ती; स्लॅब बेनिफिटही देणारनाशिक : महावितरणकडून प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटररीडिंग घेऊन दोन ते अडीच महिन्यांचे एकत्रित वीजबिल देण्यात येत असताना सदर वीजबिल अधिक असल्याच्या तक्र ारी ग्राहकांकडून होत आहे. दरम्यान, मीटररीडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरु स्त करून देण्याबरोबरच लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेची वीजबिलांमधून कपात करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. एप्रिल व मे महिन्यात मीटररीडिंग घेणे लॉकडाऊनमुळे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील वीजवापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे वीजबिल आकारण्यात आले आहे. मात्र ग्राहकांनी यासंदर्भात तक्रारी केल्या असून, सरासरीपेक्षा अधिक वीजबिले आले असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना सरासरी वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले होते तसेच अॅपवर रीडिंग टाकण्याचा पर्यायदेखील महावितरणने दिला होता. मात्र एप्रिल, मे आणि जून महिन्यात स्वत:हून मीटररीडिंग न पाठविणाऱ्या ग्राहकांना आता प्रत्यक्ष वीजवापराची बिले पाठविली जात आहेत. या बिलांबाबतच्या तक्रारी तसेच यापूर्वी सरासरी आणि आगाऊ बिले भरणाऱ्यांच्यादेखील तक्रारी वाढल्याने महावितरणने ग्राहकांचे समाधान करून त्यांच्या बिलांची आवश्यकता असल्यास दुरुस्ती करण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे.
सरासरी वीजबिल भरूनही जादा वीजबिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 6:39 PM