नाशिक: पुणे विद्यापीठाकडून लेबर लॉ या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास तब्बल अर्धातास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धातास वाढवून दिल्याने परीक्षा सुरळीत पार पडली.पुणे विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाच्या परिक्षा सध्या सुरू असून बुधवारी सकाळी १० वाजता लेबर लॉ विषयाची परीक्षा सुरू होणार होती. मात्र आॅनलाईन मिळणारी प्रश्नपत्रिका साडे दहा वाजले तरीही परिक्षाकेंद्रांना उपलब्ध न झाल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अन्य विषयांच्या प्रश्निपत्रका उपलब्ध होऊनही संपूर्ण परीक्षा प्रक्रि या तब्बल अर्धा तास उशिराने सुरू करावी लागली. याप्रकारामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण अर्धा तास ताटकळत बसावे लागले तर परिक्षा व्यवस्थापन करणाऱ्या केंद्र चालकांनाही त्रास सहन करावा लागला.प्रश्निपत्रका फुटू नये यासाठी विद्यापीठांकडून आता परीक्षेच्या काही वेळ आधी आॅनलाइन पद्धतीने प्रश्निपत्रका परीक्षा केंद्रांना पाठविल्या जातात. विधी परीक्षेतील कामगार कायदा विषयाची प्रश्निपत्रका परीक्षा केंद्रांना नियोजित वेळेत उपलब्ध झाली नाही. वारंवार प्रयत्न करूनही परीक्षेची वेळ टळल्याने विद्यार्थी व केंद्र चालकही अस्वस्थ झाले होते. या साºया प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी विचारणा करण्यास सुरु वात केल्याने केंद्रप्रमुखानाही रोषाला सामोरे जावे लागले. तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याचे सांगूनही विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने काहीशा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर तीस ते चाळीस मिनिटे उशिरा परिक्षा प्रक्रि या सुरू करण्यात आली. दरम्यान, असाच प्रकार नाशिक सह संगमनेर व अन्य परीक्षा केंद्रांवर झाल्याचे समजते.
लेबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका अर्धातास उशीरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 7:05 PM
नाशिक : पुणे विद्यापीठाकडून लेबर लॉ या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास तब्बल अर्धातास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर ...
ठळक मुद्देकाहीकाळ गोंधळ: विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा चव्हाटयावर