नाशिक : एका इंग्रजी लेखकाच्या मतानुसार निसर्ग आणि मानव यांच्यात विनाइंद्रिय संबंध मानले जातात. याच मतानुसार निसर्गाचे नुकसान होणे म्हणजेच माणसाच्या मन आणि शरीराचाच ºहास होण्यासारखे असल्याने मानवाने निसर्गाशी मैत्री करून माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.कालिदास कलामंदिर येथे ‘इक्रो फ्रेन्डली लिव्हिंग’ या डॉ. रेश्मा घोडेराव लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. विनोद विजन, डॉ. मनीषा जगताप, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, उद्योगगुरू इरफान कौचाली, देवांग जानी आदी उपस्थित होते.यावेळी कसबे म्हणाले, आपल्या प्रत्येकाचे जीवन हे निसर्गाशी नाते सांगणारे आहे. त्यामुळे आपली मैत्री ही निसर्गाशी असली पाहिजे. निसर्गाची अवकृपा झाली तर माणसाच्या जीवनात मोठा बदल घडतो असे सांगताना निसर्गाने माणसाच्या विनाशाचे सर्व हक्क सुरक्षित ठेवले आहेत असे ते म्हणाले. निसर्गावर प्रेम केले तर तो आपणावर कृपा करतो, परंतु मानवाने निसर्गाचे अतोनात नुकसान केलेले आहे. परंतु निसर्गाचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही कसबे यांनी सांगितले. निसर्गाचे संरक्षण केले तरच आपलेही संरक्षण होणार आहे. नाहीतर निसर्गाचा नाश झाला तर आपलाही विनाश होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, असे कसबे यावेळी म्हणाले.निसर्गाचे नुकसान करण्याचे अनेक हत्यारे माणसाकडे आहेत, परंतु निसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. खरे तर माणूस अजूनही माणूस बनायचा आहे. माणसाने निसर्गावर प्रेम केले तर निसर्गाकडूनही प्रेमच मिळेल, असे शेवटी कसबे म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.या पुस्तकाच्या आधारे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा आणि शिक्षकांच्या जनजागृती उपक्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी लेखक रेश्मा घोडेराव यांनी पुस्तकाचे विषय आणि पर्यावरण याविषयीची माहिती दिली. प्रास्ताविक प्रशांत घोडेराव यांनी केले. सूत्रसंचालन जयंत ठोंबरे यांनी केले.
निसर्गाशी मैत्री करून माणसाने माणूस बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:15 PM
नाशिक : एका इंग्रजी लेखकाच्या मतानुसार निसर्ग आणि मानव यांच्यात विनाइंद्रिय संबंध मानले जातात. याच मतानुसार निसर्गाचे नुकसान होणे ...
ठळक मुद्देरावसाहेब कसबे : इको फ्रेन्डली लिव्हिंग पुस्तकाचे प्रकाशननिसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही