नाशिक: महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी स्वप्नील जायभावे तर उपाध्यक्षपदी अनघा वानखेडे यांची निवड करण्यात आली. अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधींची देखील निवड यावेळी करण्यात आली. निवडीनंतर कार्यर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत निवडप्रक्रिया पार पडली. विद्यापीठाच्या अनिनियम १९८६ अन्वये विद्यापीठ विद्यार्थी परिषदेवर एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक सचिव आणि दोन सहसचिव निवडून देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी मुंबईच्या वायएमटी आायुर्वेद महाविद्यालयाचे स्वप्नील संजय जायभावे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भुसावळ येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाची विद्यार्थी अनघा श्रीकृष्ण वानखेडे , बुलढाणा येथील पंचशील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची शिवानी राजाभाऊ घुले यांची निवड झाली.सचिवपदासाठी सातारा येथील एस.सी. मुथा आर्यगल वैद्यकीय महाविद्यालयाचा पृथ्वीराज अशोक मोरे, सहसचिव पदाकरीता औरंगाबाद येथील कॉलेज आॅफ नर्सिग शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे धीरजकुमार मधुकर गावले, वाशिम येथील एमयुपीएस आयुर्वेद महाविद्यालयाची नम्रता अमरचंद यांची निवड करण्यात आली. अधिसभेवर तीन विद्यार्थी प्रतिनिधी निवडून देण्यात आले. नागपूर आयुर्वेद महाविद्यालयाची चैताली विजय लेकुरवाळे, नागपुरच्या एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे आशिष माहोर, धुळयाचे डी.एस. नाईक आयुर्वेद महाविद्यालयाची निकिता पाडवी यांची निवड करण्यात आली.कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र-संचालक संदीप कुलकर्णी यांनी विद्यार्र्थ्यांचय निवडीचे स्वागत केले. विद्यापीठाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यार्थी परिषद सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे कुलगुरू डॉ. म्हैसेकर यावेळी म्हणाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. विधी अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
आरोग्य विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 8:20 PM