रस्त्यांवर कोंडी: मेनरोड, सराफ बाजारासह रविवार कारंजावर गर्दीनाशिक: शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेतील सर्वच ठिकाणी ग्राहकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. दुकानांची वेळ दुपारी ४ वाजेपर्यंत असल्यने यापूर्वी उडणारी झुंबड कुठेही दिसून आली नसली तर शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. नाशिक जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत वर्दळ झाली होती. सर्वप्रकारची दुकाने उघडल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चढाओढ दिसून आली. कापड दुकानांपासून भांडी बाजार तसेच रेस्टॉरंट, मोबाईल, कारडेकोर, हौजअरी, गॅरेजेस तसेच बुक स्टॉल्समध्ये विशेष गर्दी झाली होती. गेल्या दोन महिन्यांपासून आवश्यक वस्तुंची खरेदी रखडल्याने सोमवारी बाजारात चैतन्य पाहायला मिळाले.शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार करंजा, महात्मा गांधी रोड, शिवाजीरोड तसेच शालीमार या ठिकाणी ग्राहकांबरोबरच वाहनांची मोठी गर्दी झाली होती. द्वारका चौकातही दिवसभरात अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रसंग उद्भवला. मेनरोडवर सकाळपासून असलेली गर्दी दुकानांची वेळ संपेपर्यंत कायम होती. अनेक ठिकाणी दुकानदारांनी शटर बंद करून दुकानात आलेल्या ग्राहकांना सेवा दिली.
अनलॉक होताचा बाजारपेठ गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 5:27 PM
नाशिक जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आल्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये सायंकाळी ४ वाजेपर्यंत वर्दळ झाली होती. सर्वप्रकारची दुकाने उघडल्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चढाओढ दिसून आली.
ठळक मुद्देशहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार करंजा, महात्मा गांधी रोड, शिवाजीरोड तसेच शालीमार या ठिकाणी ग्राहकांबरोबरच वाहनांची मोठी गर्दी शहरातील अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी