लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक: जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आला. विविध कार्यक्र मांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनान्निमित्त देशभरात १५ आॅक्टोबर रोजी विविध कार्यक्र म घेऊन हात धुण्याविषयी माहिती दिली जाते. हात धुणे दिवसाच्या निमित्ताने लोकांना हात धुण्याची ही चांगली सवय लागावी, त्यांच्या मनात हात स्वच्छतेचे महत्त्व निर्माण व्हावे या विषयी जनजागरण व्हावे, म्हणून् जागतिक हात धुणे दिवस म्हणून साजरा केला जातो.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहचिवण्यासाठी जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हात धुवा दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने व महिला व बालविकास विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडी येथे कार्यक्र माचे नियोजन केले होते.जिल्ह्यात सर्व प्रथमिक शाळा व अंगणवाडी येथे या दिनानिमित्त विदयर्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येवून हात धुण्याविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्र मात ग्रामपंचायत, ग्रामस्वच्छता समिती, निर्मलग्राम समिती, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, बचत गट, आदींचा सहभाग सहभाग घेण्यात आला. अस्वच्छ हातांमुळे कसे आजार होतात, हात केव्हा धुतले पाहिजेत याबाबत ाार्गदर्शन करण्यात येवून हात धुण्याचे प्रात्यिक्षक घेण्यात आले.जिल्ह्यात या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे स्वच्छता पंधरवडा निमित्ताने जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच अन्य शासकीय कार्यालयांची स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दिली.
चिमुकल्यांनी गिरविले हात धुण्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 4:56 PM
नाशिक: जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय हात धुवा दिनानिमित्ताने हात धुण्याचे धडे देण्यात आले. यावेळी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आला. विविध कार्यक्र मांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देजिल्हा परिषद : स्वच्छतेबाबतही विद्यार्थ्यांनी घेतली शपथ