नाशिक : नाशिककचे आघाडीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्र माला गवसणी घातली असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८५० किमीचे अंतर केवळ दहा दिवस ११ तासांत पूर्ण केले. गुरु वारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ही मोहीम पूर्ण झाली.महाजन बंधू फाउंडेशन आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत खेलो इंडिया आणि ‘तंबाखू बंद’ या अभियानाला समर्थन करण्यात आले. टूर आॅफ ड्रॅगन, रेस अॅक्र ॉस अमेरिका त्यानंतर भारतात गोल्डन क्वाड्रिलेटरल मोहीम असे प्रत्येकवेळी वेगळे उपक्र म राबवून सायकलिंगचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम महाजन बंधू करीत आहेत.दि. २ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी ही मोहीम खराब हवामान, काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि श्रीनगर जम्मू महामार्गावर कोसळलेली दरड यामुळे तीन दिवस उशिरा म्ैहणजे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी सुरू झाली. जम्मू-काश्मीरमध्ये नोव्हेंबर महिन्यात गेल्या १८ वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद झाली.सोमवारी (दि.५) रोजी लालचौक, श्रीनगर येथून सुरू झालेली ही मोहीम पुढे श्रीनगर, उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपास (पूर्व परिधीय महामार्ग), आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाडा, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नुल, अनंतपूर, बंगळुरू, कृष्णागिरी, सेलम मदुराई, तिरु नेलवेलीमार्गे कन्याकुमारी समुद्रकिनारा (विवेकानंद स्मारक) येथे मोहिमेचा समारोप करण्यात आला. कन्याकुमारी येथे डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमचे कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी प्रसाद वडनेरे यांनी तिरु वल्लूर पुतळ्याची प्रतिकृती भेट देत स्वागत केले.या वेगवान सायकल प्रवासात भारताच्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या १२ राज्यांतून प्रवास केला.
नाशिककचे सायकलपटू महेंद्र महाजन यांचा नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 6:29 PM
नाशिककचे आघाडीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्र माला गवसणी घातली असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८५० किमीचे अंतर केवळ दहा दिवस ११ तासांत पूर्ण केले. गुरु वारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ही मोहीम पूर्ण झाली.
ठळक मुद्देकाश्मीर ते कन्याकुमारी : ३८५० किमीचे अंतर ११ दिवसांत केले पार