घोटी : इगतपुरी तालुक्यातील काही दिवसांपूर्वी कोरोनारुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असताना संपूर्ण तालुक्याला भयभीत करणारे आकडे पुढे येत होते. परंतु या आठवड्यात रूग्ण संख्या दर कमी झाल्याचे समोर आले आहे. गत 6 दिवसात फक्त 7 रूग्ण पॉझिटिव्ह झाले असून तालुक्यासाठी सुखद अशी बातमी आहे.इगतपुरी तालुक्यातील काही दिवसापूर्वी कोरोनारुग्नांची आकडेवारी भयभीत करणारी होती एका दिवसाला 57 चा आकडा गाठणा?्या रुग्णसंख्येला या आठवड्यात ब्रेक बसला असून सोमवार पासून आज पर्यंत फक्त 7 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. घोटी शहरातील व्यापारपेठेत गावक?्यांनी केलेल्या 2 वाजे नंतर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून उद्या दि 11 पासून सुरळीतपणे व्यवहार सुरू होणार आहेत.घोटी शहरातील आकडेवारी झपाट्याने वाढत असतांना गावक?्यांनी घेतलेल्या निणर्याचे स्वागत करण्यात आले होते. घोटी शहरातील कोरोना रुग्नांची संख्या 463 वर गेली असून 421 आता पर्यंत बरे झाले आहेत सध्या 31 रुग्ण उपचार घेत असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.घोटी शहरातील वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचे संकट डोक्यावर घोंगावत असून व्यापारीवर्गातील दुकानदारांनी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे नागरिकांकडून मागणी होत आहे. अन्यथा पुन्हा अर्धा दिवस बंद चा निर्णय गावकरी मंडळीना घ्यावा लागेल असे संकेत देण्यात आले.इगतपुरी तालुक्यातील कोरोनारुग्नांची आकडेवारीइगतपुरी तालुका - 1502 असून, बरे झालेले 1407नगरपालिका - 358इगतपुरी तालुका ग्रामीण - 1144घोटी - 463सध्या उपचार घेत असलेले कोरोना रुग्ण - 67मृत्यू - 28माझें कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेचा समारोप इंदोरे येथे घेण्यात आला तालुका वैद्यकीय विभागाच्या वतीने गावातील 400 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 82 नागरीकांची इंटिजेंन टेस्ट करण्यात आली होती त्या तपासण्या निगेटिव्ह आल्या असून या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एम बी देशमुख, डॉ. संपतराव शेळके, डॉ दिनेश कुलकर्णी, डॉ विश्वनाथ खतेले, डॉ अक्षय माघाडे, डॉ. सुनील जाधव या टीमने तपासणी कॅम्प राबविला होता. सर्वात जास्त रुग्णसंख्या असलेल्या घोटीत मोठया प्रमाणात तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी देशमुख यांनी सांगितले.