नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.२२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ६७४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या ३० हजार ९ इतकी झाली आहे. दिवसभरात उपचारार्थ दाखल ७ रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७६८ वर पोहोचला. मृतांमध्ये नाशिकमधील २ तर ग्रामीण, मालेगावातील प्रत्येकी २ आणि जिल्ह्याबाहेरील १ रु ग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये दोन पुरु ष असून, त्या दोघांचे वय पन्नाशीच्या पुढे होते तर उर्वरित चारही महिला ज्येष्ठ नागरिक होत्या.नाशिक शहरासह तुलनेत जिल्ह्यातील कोरोना रु ग्णांची संख्या कमी झाली. यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला. नाशिक शहरात एकूण ३६२ तर ग्रामीणमध्ये २४६ रु ग्ण आढळून आले आहेत. मालेगावात ६५ रु ग्ण मिळून आले. दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी मालेगावात दुपटीने रु ग्ण मिळाले. जिल्ह्याबाहेरचा १ रु ग्ण मिळून आला. जिल्ह्यात अद्याप २४ हजार ३०७ रु ग्ण बरे झाले आहेत. सध्या ४ हजार ९३४ रु ग्ण उपचारासाठी दाखल आहेत. ८९० अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील एकूण १ लाख १५ हजार ४६२ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ८४ हजार ५६३ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. आगामी काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. आगामी उत्सवच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. शहरातील बाजारपेठेत नागरिकांची विविध वस्तू खरेदीसाठी झुंबड उडत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा होताना दिसत आहे.सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी तोंडावर मास्क लावत परस्परांत डिस्टन्स बाळगणे खूप गरजेचे आहे.
जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या ३० हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 1:16 AM
जिल्ह्यात रविवारी (दि.२२) एकूण ४१२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. जिल्ह्यात एकूण ६७४ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे आता जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या ३० हजार ९ इतकी झाली आहे. दिवसभरात उपचारार्थ दाखल ७ रु ग्ण दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा आता ७६८ वर पोहोचला.
ठळक मुद्देसात बळी : दिवसभरात ५३० रु ग्णांची कोरोनावर मात; ६७४ नवे रु ग्ण