नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी नवीन १२४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २५४०वर पोहोचली आहे. कोरोनाबळींच्या संख्येतदेखील सहाची भर पडल्याने एकूण मृतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे.जिल्ह्यातील बाधितांची संख्या अडीच हजारांकडे झेपावत आहे. शुक्रवारी शहरातील तीन मृतांसह ग्रामीण भागातील अन्य तीन अशा सहाजणांचा मृत्यू झाला.नाशिकने ओलांडले मालेगावलाजिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या संख्येत नाशिकने मालेगावला पिछाडीवर टाकले आहे. मालेगावच्या बाधितांचा आकडा ९०५ असून, नाशिकच्या बाधितांचा आकडा ९९६वर पोहोचला आहे, तर ग्रामीणमधील ४८२ रुग्ण बाधित असून, जिल्ह्याबाहेरील ७८ रुग्णांचा समावेश आहे.च्शुक्रवारी मयत झालेल्या नाशिकमधील नागरिकांमध्ये एक नाशिकच्या वडाळारोडचा, दुसरा वडाळागावातील तर तिसरा फकीर वाडीतील आहे. तर ग्रामीण भागात बळी गेलेल्यांमध्ये एक जाखोरीचा, दुसरा मालेगावचा तर तिसरा निफाड तालुक्यातील करंजगावचा रहिवासी आहे.च्कोरोनामुक्त झालेल्या कळवण तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कळवण लगतच्या मानूर गावातील शासकीय कार्यालयातील ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल गुरु वारी बाधित आल्याने यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २५००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:19 AM
जिल्ह्यात शुक्रवारी नवीन १२४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांची संख्या २५४०वर पोहोचली आहे. कोरोनाबळींच्या संख्येतदेखील सहाची भर पडल्याने एकूण मृतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या अडीच हजारांकडे झेपावत आहे. शुक्रवारी शहरातील तीन मृतांसह ग्रामीण भागातील अन्य तीन अशा सहाजणांचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देसंकट गडद : दिवसभरात ६ जणांचा मृत्यू; बळींचा आकडा १५३वर