नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ७९६ वर पोहचला तर शहराची रुग्णसंख्या ४६ इतकी झाली. शुक्रवारी जिल्ह्यात १७ नवे रुग्ण आढळून आले. मालेगावची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ६०२ झाली तर नाशिक ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा ९८ वर पोहचला आहे.
जिल्ह्यात मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत असून आज मनमाड, दिंडोरी, निफाड या तालुक्यांतील विविध नव्या गावांमध्ये करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. आज जिल्ह्यात नव्याने 12 रूग्णांची भर पडली आहे. तर रात्रीपासून आतापर्यत 6 जणांचा मृत्यू झाला असून सर्व मालेगाव येथील आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाचे 45 बळी झाले आहेत. तर आज पुन्हा 11 रूग्णांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत 548 करोना रूग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत.मालेगावची करोना बाधीतांची संख्या मोठ्या वेगाने वाढत असून यात आज 7 जणांची भर पडली. यामुळे मालेगावचा आकडा ६२५ झाले. मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज जिल्ह्यात 11 रूग्ण बरे झाले आहेत.आज आढळलेल्या 12 रूग्णांमध्ये मालेगाव येथील 7 तर मनमाड येथील दोन, निफाडच्या विष्णुनगर, कसबे सुकेने येथील 1, सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील 1, रूग्ण आढळून आले आहेत. यासह उर्वरीत जिल्ह्यात 103 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. तर यात जिल्ह्या बाहेरील 30 जणांचा समावेश आहे. यातील 28 जण करोनामुक्त झाले आहेत.दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत 38 हजार 709 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 7 हजार 381 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 6 हजार 322 निगेटिव्ह, 796 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 122 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 268 अहवाल प्रलबिंत आहेत.
शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालात महापालिका हद्दीतील जुने नाशिक, गोसावीवाडी, नाशिकरोड आणि दसक-पंचक जेलरोड या भागात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. या दाट लोकवस्तीत कोरोनाने प्रवेश करू नये, असे प्रत्येक नाशिककराला वाटत होते; मात्र सातपूर येथील त्या कोरोनाबाधित महिलेच्या संपकर् ात आलेली कुंभारवाड्यात राहणारी एक महिला कोरोनाबाधित आढळून आली.