नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. दिवसभरात तब्बल ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नाशकात २ मे रोजी शासकीय रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा मृत्यूपूर्वी घेतलेल्या नमुन्याचा तपासणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने शहरातील हा कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागातर्फे घर सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. त्यावेळी नाशिक-पुणे महामार्गावर वास्तव्यास असलेल्या एक महिलेची प्रसूती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला आडगाव रुग्णालयात तातडीने दाखल होण्यास २४ एप्रिल रोजी सांगण्यात आले होते;२ मे रोजी ही महिला शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यापूर्वी तिची चाचणी करण्यात आली होती.-----मालेगावी २८ कोरोना मुक्तमालेगावी कोरोनाचा विळखा कायम असतांना दि.२६ एप्रिल ते ४ मे या ९ दिवसाच्या कालावधीत २८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ही देण्यात आला आहे. या शिवाय मंगळवारी सायंकाळी प्रशासनाला प्राप्त ५० अहवालही निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.--------मालेगावी दोनजणांचा काही दिवसापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचाही पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी प्राप्त झाला.मंगळवारी नाशिक जिल्ह्यात तब्बल ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मालेगाव येथील १८, येवला येथील १७, देवळाली कॅम्प येथील ७ तर नाशिक शहरातील चार जणांचा समावेश आहे. एकाच दिवसात तब्बल ४६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मालेगावी दोनजणांचा काही दिवसापूर्वीच कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचाही पॉझिटिव्ह अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. च्मंगळवारी नाशिक जिल्ह्यात तब्बल ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मालेगाव येथील १८, येवला येथील १७, देवळाली कॅम्प येथील ७ तर नाशिक शहरातील चार जणांचा समावेश आहे. एकाच दिवसात तब्बल ४६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या १५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 10:47 PM