सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून शनिवारी (दि.8) सायंकाळपर्यंत 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 713 वर पोहचली आहे. आरोग्य विभागाला काल प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील 6 तर ग्रामीण भागातील 9 असे एकुण 15 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. शहरातील लोंढे गल्लीतील 24 वर्षीय महिला, मुक्तेश्वर नगर येथील 29 वर्षीय पुरुष, मॉडर्न कॉलनीतील 43 वर्षीय पुरुष, काजीपुरा येथे 75 वर्षीय पुरुष, डुबेरे नाका येथे 35 वर्षीय पुरुष, कमलनगर येथे 48 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागात जामगाव येथे 62 व 35 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा, ठाणगाव येथे 54 वर्षीय पुरुष व 42 वर्षीय महिला, माळेगाव एमआयडीसी येथे 35 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडे येथे 45 व 44 वर्षीय पुरुष, शिवडे येथे समृध्दीच्या कामावरील 22 वर्षीय तरुण असे तालुक्यात एकुण 15 रुग्णांची भर पडली आहे.
त्यामुळे तालुक्यात एकुण 713 कोरोना बाधितांची संख्या झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.