दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतातच परंतु यंदा चिकुनगुन्याचे रुग्णही वाढले आहेत. जून महिन्यातच सुमारे साठ रुग्ण सातपूर परिसरात आढळण्यास सुरुवात झाली. मात्र, नंतर शहराच्या सर्वच भागात रुग्ण आढळत आहेत. जून महिन्याच्या अखेरीस चिकुनगुन्याचे ८५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर जून महिन्यात डेंग्यूचे ४० रुग्ण हाेते. मात्र, आता ही संख्या वाढून १८५ वर तर जानेवारीपासून आत्तापर्यंत एकूण २६६रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूप्रमाणेच चिकुनगुन्याचे रुग्ण देखील वाढत गेले. जुलै महिन्यातच या आजाराचे १४८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जानेवारीपासून आत्तापर्यंत चिकुनगुन्याचे २६६ रुग्ण आढळले आहेत.
महापालिकेच्या वतीने शहरात रोगराईमुळे महापालिका सतर्क झाली असून, डास निर्मूलन फवारणीवर भर देतानाच घर सर्वेक्षण डासांची उत्पत्तीस्थाने शोधणे या कामांसाठी ३६ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
इन्फो...
पावसाची संततधार किंवा मुसळधार पाऊस सुरू असेल तर अडचण येत नाही, मात्र अधून-मधून पाऊस झाल्यास छतावर, टायर किंवा नारळाच्या करवंट्या आणि अन्य ठिकाणी देखील पाणी साचून त्यात डेंग्यू पसरवणारे डास तयार हाेतात. त्यामुळे अशाप्रकारचे पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.