अमृत कळमकर ।खडकी : ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे. बहुतांश रहिवास ग्रामीण भागात आहे. खेडी विकसित झाली तरच देशाच्या विकासाचा मंत्र महात्मा गांधींनी दिला आहे, मात्र खेडी व ग्रामीण भाग वाढत्या शहरीकरणामुळे ओस पडू लागली आहेत. रोजगार संधी उपलब्ध करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य दिले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती जैसे थे आहे.सांस्कृतिक वारसा लाभलेला ग्रामीण भाग जुन्या पद्धती विसरत असल्याने वडिलोपार्जित शेतीसारखा मोठी संपत्तीचा ठेवा आधारित व अंधातरीच राहताना दिसत आहे. ग्रामीण भागात शेती प्रमुख व्यवसाय असल्याने खेडी गजबजलेली दिसत होती. सायंकाळी रानातून गावाकडे येणारी गुरे आनंदाला भुरळ घालताना सध्या दिसत नाही.ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाकडे किमान दहा जनावरे होती, त्यात ग्रामीण गायींची संख्या पाचच्यावर असे. गायी रानात नेऊन चारण्यासाठी गायक्या होता. गावातील एक-दोन तरुण आपला रोजगार व उदरनिर्वाहासाठी गायी चारत असे. गायींच्या शेणाची संपत्ती व राखाईत म्हणून धान्य मोबदला किंवा पैसे स्वरूपात मदत दिली जात असे, मात्र हे गुराखी गायकेच नसल्याने गायी पाळणे बंद झाले आहे. ग्रामीण भागातील अशा गुराख्यांना मानधनपर योजना सुरू करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठ्या कुटुंबात गायीच्या दुधाची रेलचेल असल्याने भाजीची चिंता गृहिणींना जाणवत नसे, मात्र लहान बाळ व तरुणाई सुदृढ आरोग्यपूर्ण होती. यामुळे आरोग्यही फार तंदुरुस्त राहिलेले नाही. आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत.सेंद्रिय शेतीचा ट्रेंड विकसित होत असला तरी त्यासाठी पूरक खते मात्र लोप पावत आहे. शेणखत सेंद्रीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. शेतकºयांनी रासायनिक खतांचा वापर करून शेतीचा कस कमी झाला आहे. पोत सुधारण्यासाठी शेणखताची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. रासायनिक खतांना अनुदान देण्यापेक्षा गायीचे रान फुलविणे महत्त्वाचे आहे. फवारणीयुक्त भाजीपाला, अन्नधान्य, फळे, फुले यामुळे उत्पादन वाढले असले तरी त्याचे पोषणयुक्त घटक कमी झाले आहे. वाढते उत्पादन घातक औषधांनी आरोग्याला अपायकारक आहे. उत्पादन काढूनही आपले उत्पादन निर्यातक्षम बनविण्यासाठी रासायनिक खते व औषधे वापर कमी करून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यासाठी उपयुक्त जीव संवर्धन करून त्यांचे पोषण करणे शेती जिवंत ठेवण्यासाठी फलदायी ठरणार आहे. दुग्ध व्यवसाय विकसित होत असला तरी जर्सी गायींना प्राधान्य योजना सुरू आहे, मात्र गायींचा उपयोग फक्त दुधासाठीच होत आहे.गायीच्या दुधाला वाढती मागणीग्रामीण भागात गावरान गायींचे दूध व शेणखताला मोठ्या प्रमाणात मागणी असते. रानात गावरान गायींचा वावर मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकºयांनी वावर ही शेतीची कल्पना अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, तरच शेती व माती वाचणार आहे. गावरान गायीच्या राखामुळे गुराख्यांना रोजगार मिळणार आहे. तसेच सेंद्रिय शेतीमुळे प्रोत्साहन मिळून भविष्यातील आरोग्याचे प्रश्न सुटून तरुणांची सुदृढता वाढणार आहे.
ग्रामीण भागात देशी गायींची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:40 PM
ग्रामीण भागात गायी गव्हारे बंद झाल्याने गावरान (देशी) गायींची संख्या घटत चालली आहे. परिणामी शेतकामांसाठी बैलांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहे. गोशाळेसह शेतकऱ्यांना गावरान गायी पालनासाठी शासकीय योजना सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
ठळक मुद्देमालेगाव । गो-पालन योजना शासनाने सुरू करण्याची मागणी