शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मनपा अंगणवाडीतील मुलांच्या पटसंख्येत घट; अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या नोकरीवर गदा

By suyog.joshi | Updated: February 8, 2025 18:02 IST

लवकरच अंगणवाड्यांतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार

सुयोग जोशी, नाशिक : गेल्या काही वर्षांपासून मुलांची संख्या घटत असल्याने महापालिकेतील समाज कल्याण विभागातर्फे अंगणवाडी सेविकांसह मदतनिसांना कमी केले जाणार आहे. लवकरच अंगणवाड्यांतील मुलांच्या संख्येबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिकेच्या शहरात सुमारे तीनशेच्या आसपास अंगणवाड्या असून मुख्यसेविका, अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्यावर या अंगणवाड्यांची जबाबदारी आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाचे धडे दिले जातात. दरम्यान, मागील काही वर्षांत शहरात खासगी अंगणवाड्यांची संख्या कमालीची वाढल्याने मनपाच्या अंगणवाड्यांमध्ये मुलांना टाकण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. महापालिकेच्या अंगणवाड्यांमध्ये मानधन तत्त्वावर ३१० अंगणवाडीसेविका, २८८ मदतनीस व सहा मुख्यसेविका सद्य:स्थित कार्यरत आहेत. दरम्यान, मुलांची संख्या रोडावल्याने महापालिकेच्या समाज कल्याण विभागाकडून शहरातील अंगणवाड्यात येणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. घटलेल्या संख्येवरून अंगणवाडीसेविकांसह मदतनिसांना कमी केले जाणार आहे. मनपाच्या समाज कल्याण विभागांतर्गत अंगणवाड्यांचा विषय येतो. १९९४ पासून सेविका व मदतनीस मानधन तत्त्वावर काम करत आहे. मात्र अंगणवाड्यांमध्ये मुलांची संख्या कमी झाल्याचे कारण देऊन त्यांना कमी केले जाणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये अंगणवाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले जाणार असून, दीड ते दोन आठवडे सदर सर्वेक्षण पूर्ण होईल. मुख्यसेविकांसाठी आठ हजार पाचशे रुपये, सेविकेला सात हजार ६२०, तर मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेला सात हजार रुपये दिले जातात.

मनपाच्या अंगणवाड्यांमधील मुलांची संख्या घटली आहे का, याची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. पटसंख्या घटल्याचे समोर आल्यावर सेविका, मदतनिसांची कपात केले जाईल.-नितीन नेर, उपायुक्त, समाज कल्याण, मनपा

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी