शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

ग्रामीण सायबर पोलिसांनी राज्यात पटकाविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 4:21 PM

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्दे एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश

नाशिक : ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर गुन्ह्यांमधील रोख रक्कम पुन्हा मिळविण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सायबर पोलिसांनी २०१९ साली आॅनलाईन सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यांमधील तब्बल १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा वसूल करण्यास यश मिळविले. तसेच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये हे पोलीस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. इमारतीत सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याचेप्रमुख निरिक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरिक्षक कल्पेश दाभाडे यांच्यासह नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, प्रमोद जाधव, परिक्षीत निकम, प्रकाश मोरे, सुनील धोक्रट, विकास टेकुळे, सरिता अक्कर, प्राजक्ता सोनवणे यांचा चमू कार्यरत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणूकीचा छडा लावत या पथकाकडून २०१९ साली तब्बल दाखल २५ गुन्ह्यांमधील १६ लाख ५० हजारांच्या रकमेपैकी एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली गेली. यामुळे ज्या फिर्यादींची फसवणूक झाली होती, त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. आॅनलाइन फसवणूकीचा प्रकार लक्षात घेत त्यानुसार आपले कौशल्य वापरू न कायद्याचे निरिक्षण नोंदवित काही गुन्ह्यांत संबंधित बॅँकांना जबाबदार धरत त्यांच्या ग्राहकांची फसवणूकीत गेलेली रक्कमदेखील सायबर पोलिसांनी मिळवून दिली आहे, असे अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. सायबर पोलिसांच्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आॅनलाइन पेमेंट अ‍ॅप्लीकेशनचा वाढता वापर अणि आॅनलाइन फसवणूकीचे वाढते प्रमाण यामुळे २०१९साली २५ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात जिल्ह्याच कानाकोपऱ्यातून दाखल झाले.३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यशग्रामीण सायबर पोलीसांना मागील तीन वर्षांमध्ये दाखल १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले. त्यामुळे हे पोलीस ठाणे राज्यात गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चौथ्या क्रमांकावर राहिले. २०१९ साली २५ पैकी १० तर २०१८मध्ये ३६पैकी १० आणि २०१७साली ४८पैकी केवळ १३ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिस यशस्वी झाले होते. मागील वर्षभरापासून सायबर पोलिसांच्या कामगिरीची आलेख अधिक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उंचावलेला आकडेवाडीवरून दिसून येतो.

टॅग्स :Nashikनाशिकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसArti Singhआरती सिंग