मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना मात्र नोकरीची प्रतिक्षा लागून आहे.परीक्षेत पेपर १ व २ करिता ३ लाख ४३ हजार २८४ उमेदवार सहभागी झाले होते. यामधून पेपर एकचे १० हजार ४८७ उमेदवार तर पेपर दोनचे ६ हजार १०५ उमेदवार पात्र झाले आहेत. २०१३ पासून ते २०२० पर्यंत एकूण सहा वेळा टीईटी परीक्षा घेण्यात आली आहे. यातून ८६ हजार २९८ परीक्षार्थी पात्र झाले आहेत. या संदर्भात उर्दू शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेत एकूण ८६ हजार तर केंद्रीय पात्रता परीक्षेत २० हजारच्या आसपास उमेदवार पात्र झाले आहेत. हा आकडा १ लाखाच्या वर असून सर्व उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी शासनाने तातडीने शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे. उर्वरित शिक्षक भरती प्रक्रि या सुरू करावी यासह अन्य मागण्यासाठी उर्दु शिक्षक संघातर्फे १ जूलैपासून राहत्या घरी गेल्या ४१ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. राज्यात २०१३ या वर्षाच्या टीईटी परीक्षेत ३१ हजार ७२ उमेदवार पात्र झाले होते. यातील काही उमेदवारांना अद्याप नोकरी मिळाली नाही आणि या वर्षाच्या सप्टेंबरमध्ये त्यांचे प्रमाणपत्राची मुदत संपत आहे. याबाबतीत तत्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा, तसेच पवित्र प्रणाली मार्फत सुरू असलेली भरती पूर्ण करावी , अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.चौकट :पात्र शिक्षक असे आहेत२०१३ - ३१,०७२२०१५ - ९५९५२०१७ - १०३३७३२०१८ - ९६७७२०२० - १६५९२
शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 6:50 PM
मालेगाव : राज्यात शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा राज्यात यावर्षी १९ जानेवारी घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ५ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. शिक्षक पात्रताधारकांचा आकडा लाखावर गेला असतांना पात्र उमेदवारांना मात्र नोकरीची प्रतिक्षा लागून आहे.
ठळक मुद्देटीईटी परीक्षा : सर्व उमेदवारांना नोकरीची प्रतिक्षा