दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रार्दूर्भाव सुरु च गुरु वारी (दि.३०) सात रु ग्ण आढळले आहे. त्यात वणी येथील सहा जणांचा समावेश आहे. तालुक्यातील रु ग्णसंख्या द्विशतकांच्या उंबरठ्यावर असून एकूण रु ग्णसंख्या १९९ झाली आहे.गुरु वारी गवळवाडी येथे ६२ वर्षीय पुरु ष तर वणी येथे एकूण सात रु ग्ण आढळले असून त्यात एका कुटुंबातील ८० वर्षीय महिला तर दुसरे जुन्या रु ग्णाचे संपर्कातील ५४, ४७, २४ व १८ वर्षीय पुरु ष तसेच ५४ वर्षीय महिला असे एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.औद्योगिक क्षेत्रातील चार कंपन्यांमध्ये एकूण ११५ कामगार बाधित झाले आहेत. यातील बहुतांशी कामगार नाशिक शहरातील रहिवाशी आहेत. प्रशासनाने तालुक्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वणीत कोरोनाचे सहा रु ग्ण तालुक्यातील संख्या द्विशतकाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 10:23 PM
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाचा प्रार्दूर्भाव सुरु च गुरु वारी (दि.३०) सात रु ग्ण आढळले आहे. त्यात वणी येथील सहा जणांचा समावेश आहे. तालुक्यातील रु ग्णसंख्या द्विशतकांच्या उंबरठ्यावर असून एकूण रु ग्णसंख्या १९९ झाली आहे.
ठळक मुद्देऔद्योगिक क्षेत्रातील चार कंपन्यांमध्ये एकूण ११५ कामगार बाधित