जिल्ह्यात कोरोना बाधितांचा संसर्ग वाढतच असून यंदा गतवर्षी पेक्षा अधिक रूग्ण आढळत आहेत. २७ मार्च रोजी जिल्ह्यात आजवरची सर्वात उच्चांकी म्हणजेच ४ हजार ९१८ बाधितांची संख्या आढळली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. याच दिवशी तब्बल २५ रूग्णांचा मृत्यू देखील झाला होता. म्हणजेच बाधितांची संख्या वाढत असताना मृत्यू दर देखील वाढत असल्याचे आढळले होते. मात्र २८ मार्च पासून बाधितांची संख्या कमी हेात गेल्याने काहीसा दिलासा मिळाला हेाता. या दिवशी २ हजार ९२५ बाधीत आढळले होते तर २९ मार्च रोजी २ हजार ८४७ इतके बादीत आढळले होते. बाधीतांचा दैनंदिन आकडा तीन हजाराच्या आत असतानाच मंगळवारी मात्र पुन्हा साडेतीन हजार गाठले. मंगळवारी ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. यात नाशिक शहरात २ हजार ९६, ग्रामीण भागात १२६९, मालेगाव महापालिका क्षेत्रात १२१ तर जिल्हा बाह्य ४६ रूग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात २३ जणांचा मृत्यू झाला असून यात नाशिक शहरातील दहा, मालेगाव महापालिकेतील दहा, ग्रामीण भागातील नऊ रूग्णांचा समावेश आहे. या २३ रूग्णांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बळींची संख्या २ हजार ३७४ झाली आहे.
इन्फो...
नाशिक शहरात उपचाराधिन कोरोना बाधीतांची निच्चांकी संख्या सुमारे सहाशे इतकी कमी झाली होती. जानेवारी महिन्यातील या निचांकी संख्येनंतर मात्र सध्या केवळ नाशिक शहरातील उपचाराधीन रूग्णांची संख्या १५ हजार ९०८ इतकी झाली आहे.