नाशिक : शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २९ रुग्ण बरे झाले. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण शहरातील आहे.कोरोनाचे वाढते थैमान रोखायचे कसे, असा प्रश्न आता प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. दररोज जिल्ह्यात चौदाशे रुग्ण आढळून येत आहे. तसेच मागील तीन दिवसांपासून पंधराच्यापुढे रुग्ण दगावत होते; मात्र गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यात २९ रुग्ण मृत्युमुखी पडले. यापूर्वी मृतांचा दिवसभराचा २३ हा उच्चांक होता. आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये २९८, शहरात ५७६, मालेगावात १२२ आणि जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण १ हजार २० रुग्ण कोरोनाशी झुंज देताना मृत्युमुखी पडले आहेत.मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख चढता असून, अद्याप घसरण होत नसल्याने प्रशासनही चिंतित आहे. गुरुवारी दिवसभरात जिल्ह्णात १ हजार ३२१ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत. त्यापैकी १०७४ रुग्ण नाशिक शहरातील आहे.शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ हजार ८४३ झाली आहे, तर ग्रामीणचा कोरोनाबाधितांचा आकडा १२ हजार ९७ वर पोहोचला आहे. शहरात आतापर्यंत २७ हजार ६६० रुग्ण, तर ग्रामीणमध्ये ८ हजार ५०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.मालेगाव मनपा हद्दीत रुग्णसंख्या ३ हजार २१ झाली असून, २ हजार २८९ रुग्ण बरे झाले आहेत. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीणमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुका-पातळीवरसुद्धा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.दहा दिवसांत जिल्ह्यात १४८ मृत्यू१ सप्टेंबर - ५२ सप्टेंबर - १७३ सप्टेंबर - ६४ सप्टेंबर - ११५ सप्टेंबर - १०६ सप्टेंबर - १२७ सप्टेंबर - २०८ सप्टेंबर - २०९ सप्टेंबर - १८१० सप्टेंबर - २९गुरुवारी शहरात ९५०, ग्रामीणमध्ये ४६९, तर मालेगावात ४४ नवे रुग्ण आढळले.आतापर्यंत ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत, तर ९ हजार रुग्ण उपचार घेत आहेत.येवला तालुक्यातील ३४ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. बाधितांच्या संपर्कातील ७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत.मनमाड शहरात नव्याने २७ बाधित रु ग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या आता ५४०वर गेली आहे. त्यापैकी ४५५ जण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात बळींचा आकडा हजाराच्या पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 1:32 AM
शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी १ हजार २९ रुग्ण बरे झाले. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण शहरातील आहे.
ठळक मुद्देकोरोना : एकाच दिवशी २९ बाधितांचा मृत्यू; नवे १ हजार ४६५ रुग्ण आढळले