लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्णात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्णातील सध्या बाधित असलेल्या एकूण २,८८८ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १,५५९ असिम्पटॅमॅटिक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.जिल्ह्णात सद्यस्थितीत २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरू असून, रविवार दुपारपर्यंत ४५४ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ९३२ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८७०, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ७९, तर जिल्ह्णाबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ८८८ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्णात एकूण ११ हजार ९४३ रु ग्ण आढळून आले आहेत. मात्र, त्यातील ८,६०१ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन यापूर्वीच घरी परतले आहेत. लक्षणेहीन आठवडाभरात बरेज्या रुग्णांना कोरोनाची अत्यल्प बाधा झालेली आहे किंवा ज्या रुग्णांमध्ये लक्षणे अजिबात नाहीत, केवळ त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते बाधित ठरले, अशा रुग्णांना बरे होण्याचा कालावधी देखील पाच ते सात दिवस अर्थात केवळ एक आठवडा असतो. त्यामुळे असे अत्यल्प बाधित रुग्ण एखाद्या क्वारंटाइन सेंटरमध्येदेखील अगदी सहजपणे उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ ९७ रुग्ण व्हेंटिलेटरवर : ज्या रुग्णांना श्वसनाचा प्रचंड त्रास जाणवू लागतो, केवळ अशा रुग्णांनाच आॅक्सिजनवर किंवा सर्वाधिक गंभीर असणाऱ्यांनाच व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. जिल्ह्णात सद्यस्थितीत ६७२ रुग्ण हे आॅक्सिजनवर तर केवळ ९७ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. तालुकानिहाय रुग्णनाशिक १८८चांदवड २४सिन्नर ११७दिंडोरी ५०निफाड १६५देवळा २१नांदगाव ६३येवला ४०त्र्यंबकेश्वर १५सुरगाणा १५पेठ ०३बागलाण ३६इगतपुरी १५४मालेगाव ग्रामीण ४१
जिल्ह्यात अत्यल्प बाधितांचेच प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:16 PM
नाशिक : जिल्ह्णात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत असले तरी जिल्ह्णातील सध्या बाधित असलेल्या एकूण २,८८८ अॅक्टिव्ह रुग्णांपैकी तब्बल १,५५९ असिम्पटॅमॅटिक आणि १२७६ अल्प लक्षणे असलेले बाधित आहेत. त्यामुळे एकप्रकारे या अत्यल्प बाधित रुग्णांची बरे होण्याची शाश्वती अधिक आहे.
ठळक मुद्देबरे होण्याची शाश्वती : ८,६०१ रुग्ण परतले घरी; २८२८ जणांवर उपचार सुरू