नाशिक : दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने शहरातील बाधितांची संख्या आता साडेचारशेच्या उंबरठ्यावर आली आहे. सोमवारी (दि.८) एकूण वीस रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ४४७ झाली आहे. यात जुन्या नाशकातच ११ रुग्ण आढळले आहेत, तर नाईकवाडीपुरा येथील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने आता शहरातील मृतांची संख्या २१ झाली आहे.शहर पूर्वपदावर येत असताना दुसरीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. नाईकवाडी पुरा येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीला त्रास होत असल्याने त्याला ५ जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा रविवारी (दि.७) मृत्यू झाला. त्याचा अहवाल महपालिकेला उशिराप्राप्त झाला. त्यामुळे आता त्याची नोंद करण्यात आली आहे. या एका बाधितामुळे मृतांची संख्या २१ झाली आहे. जुन्या नाशिक भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात अमरधामरोडवरील एका ४३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर येथील कुंभारवाडा ३४ वर्षीय महिलेबरोबरच ८० वृद्ध महिला तसेच ३६ वर्षीय व्यक्ती व १५ वर्षीय मुलाना कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे, तर अमरधामरोडवरील एका सहा महिन्यांच्या बालिकेचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नाईकवाडी पुरा येथील २७ वर्षीय महिला, शितळादेवी मंदिर परिसरातील ८५ वर्षीय वृद्धा, अमजेरी मशिदजवळल ६९ वर्षीय वृद्धा, खडकाळी येथील ४३ वर्षीय महिला आणि जुन्या नाशिकमधीलच आझादनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.याशिवाय सिडकोतील पंडितनगर येथील १८ वर्षीय, सिडकोतीलच ३६ वर्षीय महिला, नाशिकरोड येथील सुभाषरोडवरील ५५ वर्षीय महिला, दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील ६० वर्षीय महिला हे रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरूद्वारारोडवरील शिंगाडा तलाव या भागात ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर शिंगाडा तलाव परिसरातदेखील एका ६५ वर्षीय वृद्धाला संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
बाधितांची संख्या ४५०च्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 12:21 AM
दिवसागणिक वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने शहरातील बाधितांची संख्या आता साडेचारशेच्या उंबरठ्यावर आली आहे. सोमवारी (दि.८) एकूण वीस रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ४४७ झाली आहे. यात जुन्या नाशकातच ११ रुग्ण आढळले आहेत, तर नाईकवाडीपुरा येथील एका बाधिताचा मृत्यू झाल्याने आता शहरातील मृतांची संख्या २१ झाली आहे.
ठळक मुद्देआणखी एकाचा मृत्यू : जुन्या नाशिकमध्ये ११ रुग्ण