नामपूर : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्पाक पठाण यांची निवड करण्यात आली. निवडणुकीत अश्पाक पठाण यांना १० मते, तर प्रतिस्पर्धीर् उमेदवार अशोक पवार यांना सात मते मिळाली. आवर्तनानुसार सरपंच कविता सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. मंडल अधिकारी सी पी अहिरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून, तर तलाठी काष्ठे यांनी साहाय्य केले. यावेळी ज्येष्ठनेते तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक सावंत, प्रभारी सरपंच जयश्री सावंत, माजी सरपंच प्रमोद सावंत, मंगलाबाई सावंत, किरण अहिरे, सोनाली निकम, पुष्पा मुथा, कविता सावंत, रंजना मुथा, अशोक पवार, जिभाऊ मोरे, त्रंबक सोनवणे, करु णा अलई, किरण माळी, कलाबाई माळी, सरला सोनवणे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
नामपूर सरपंचपदी अश्पाक पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 2:39 PM