शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अंगणवाड्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:06 PM

नाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्ह्णातील अंगणवाड्या अद्यापही बंदच असल्याने अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदरमातांसाठी घरपोच पोषण आहार देण्यात येत असून, पावसाळा व कोरोनाचा विचार करता सर्व अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार पुरविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्याला भेट देऊन पोषण आहाराचा आढावा घेतला.

ठळक मुद्देवाटपाचा आढावा : अश्विनी आहेर यांची इगतपुरीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या संक्रमण काळात जिल्ह्णातील अंगणवाड्या अद्यापही बंदच असल्याने अंगणवाडीतील बालके, स्तनदा व गरोदरमातांसाठी घरपोच पोषण आहार देण्यात येत असून, पावसाळा व कोरोनाचा विचार करता सर्व अंगणवाड्यांना सप्टेंबरअखेरपर्यंत पोषण आहार पुरविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्याला भेट देऊन पोषण आहाराचा आढावा घेतला.सभापती अश्विनी आहेर यांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी (संभाजीनगर), बोरटेंभे, पिंप्रीसदो, भावली येथील अंगणवाडी केंद्र तसेच पंचायत समिती इगतपुरी, एकात्मिक बालविकास सेवायोजना प्रकल्प (आयसीडीएस) कार्यालयास भेट देऊन घोटी येथील अंगणवाडी सेविकांची बैठक घेण्यात येऊन त्यात बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांच्याबाबत कोरोना काळात कशाप्रकारे काळजी घेतली जाते याबाबत जाणून घेण्यात आले. सर्व बालकांना अंगणवाडी सेविका मार्फत घरपोच गरम ताजा आहार, अमृत आहार दिला असून, सर्व बालकांचे वजन घेऊन लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बालकांचे कुपोषण कमी होऊन बालमृत्यू होऊ नये, बाळाची काळजी योग्यप्रकारे घेतला जावी यासाठी स्तनदा मातांना बेबी केअर किटचे वाटप सभापतींच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी भागातील मुलांना राष्ट्रपती अब्दुल कलाम अमृतआहार योजनेंतर्गत पिंपी सदो येथील लाभार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आले.इगतपुरी पंचायत समिती एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील सर्व पर्यवेक्षिकांची बैठक घेऊन कामकाज आढावा घेण्यात आला. बैठकीत अमृत आहार, गरम ताजा आहार, टी.एच.आर, गृहभेटी, ग्राम बाल विकास केंद्राचा आढावा घेण्यात आला. कोरोना पार्श्वभूमीवर गृह व्ही.सी.डी.सी चालू आहेत. त्यामुळे प्रत्येक कुपोषित बालकांना अंगणवाडीसेविकामार्फत बालकांना आहार देण्याच्या तसेच पोषण आहारबाबत कोणतीही तक्रार आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा सभापती आहेर यांनी दिला. याबैठकीस इगतपुरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, सहायक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीzpजिल्हा परिषद