भाऊसाहेबनगर : निफाड तालुक्यातील मौजेसुकेणे येथे एकात्मिक बालविकास योजना विकास प्रकल्प कार्यक्रमांतर्गत बीटस्तरीय पोषण आहार जनजागृती व पालकमेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी मौजे सुकेणेच्या सरपंच वृषाली भंडारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली मोगल, सुनीता मोगल, कसबे सुकेणेच्या सरपंच गीता गोतरणे, आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. रचना धोंडगे, ग्रामविकास अधिकारी शेटे, पर्यवेक्षक संगीता लोहकरे उपस्थित होते.यावेळी पोषणदिंडी, आहारप्रदर्शन, रांगोळी व पाककृती आदी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच पोषण आहाराचे महत्त्व, अॅनिमिया, बेटी बचाओ-बेटी पढाओ याबाबत मार्गदर्शन करण्यात येऊन जनजागृती रॅली काढण्यात आली. सुनीता आहेर, मीरा पडोळ, छाया गुळवे यांनी परिश्रम घेतले.
मौजेसुकेणे येथे पोषण आहार जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 1:05 AM