परिसरात लागवड केलेल्या सर्व भाज्यांचे तसेच रानमाळावर, जंगलात उपलब्ध असणाऱ्या विविध भाज्यांचे प्रदर्शन मांडून प्रत्येक भाज्यांचे शरीरास आवश्यक असणारे महत्त्व पांडुरंग आंबेकर, सुमन क्षीरसागर व निर्मला दिघे यांनी पटवून दिले.
जागतिक ओझोन संरक्षणदिनी ओझोनचे महत्त्व, त्याचे होणारे फायदे याची माहिती वैशाली वालझाडे, कुंदा फणसे, कल्पना खैरनार यांनी दिली. डॉ. जाधव व खैरनार यांनी सकस आहार व त्याचे फायदे याविषयी माहिती दिली. गावातील अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका यांनी किशोरवयीन मुलींशी चर्चा करत त्यावरच्या उपायाबाबत सल्ला दिला. सदर सप्ताहाचे नियोजन मुख्याध्यापक देवरे व सर्व शिक्षक वृंद यांनी केेले.