नाशिक : शहरात दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान बाजारपेठेत पतंग आणि मांजाची दुकाने सजू लागतात. पतंग उडविण्यास कुणाचा विरोध नाही, परंतु यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर करण्यात येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. विशेषत: वाहनचालकांच्या मानेला मांजा अडकून अपघात होत असून, पक्षीदेखील जखमी होत आहेत. मकरसंक्रांतीच्या सणापूर्वीच सुमारे एक महिना आधीपासून नायलॉन मांजाची काही ठिकाणी उघडउघड तर काही ठिकाणी चोरीछुपे विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी अंबड, पंचवटी, जुने नाशिक भागात दुकानांवर छापे टाकून नायलॉन मांजा जप्त केला आहे. तरीही अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे.जे पालक मुलांना सदरचा मांजा खरेदी करण्याकरिता प्रोत्साहन देतील त्यांच्यावरदेखील तसेच पालक व नातेवाइकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. सरकारने नायलॉन मांजा हा मानव, प्राणी, पशु-पक्ष्यांसाठी अतिशय घातक असल्याकारणाने त्यावर त्वरित बंदी आणण्याची गरज आहे.पशुपक्षी, मानवी जिवांना धोकापशुपक्षी व मानवी जिवांना विशेषत: अंध व्यक्तींना जखमी करणाऱ्या व घातक ठरणाºया नायलॉन मांजावर त्वरित कायदेशीर बंदी आणावी. तसेच सदर नायलॉन मांजा उत्पादन करणे, साठवणूक करणे, वाहून नेणे, विक्री करणे, मांजाचा व्यवहार करणे अशा हालचालींमध्ये सहभागी असणाºया व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा.
नायलॉन मांजाने रस्त्यावर वाढले अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:05 AM