येवला : पतंगाच्या मांजाने २० वर्षीय युवकाचा गळा कापल्याची घटना शक्रवारी हुडको परिसराजवळ घडली. नसीब बलवत्तर म्हणून सुदैवाने खोलवर जखम झाली नसल्याने जीव वाचला; पण गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंकज रवींद्र करमासे (२० ) असे या जखमी युवकाचे नाव आहे. नायलॉन मांजाविक्र ीवर बंदी घातली असतानाही अशा घटना घडत आहे.हुडको कॉलनी परिसरात राहणारा हा युवक महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे दुचाकीने तो रस्त्यावरून जात असतांना पतंगाच्या मांजामुळे पंकजचा गळा कापला. त्यामुळे ती दुचाकीवरु न थांबला.तातडीने रक्तस्त्राव थांबण्यासाठी रु माल बांधला . त्यानंतर त्याला खाजगी रु ग्णालयात नेण्यात आले.मांजामुळे गळ्याला जखम झाली.तातडीने उपचार केल्यामुळे रक्तस्राव थांबला.नागरिकांनी मकरसक्र ांतीच्या दिवसात पतंग उडविण्याचा आनंद घ्यावा. मात्र नायलॉन, मांजाचा वापर करु नये, असे आवाहन डॉ. किशोर पिहलवान यांनी पत्रकारांशी बोलताना केले.(वार्ताहर )
नायलॉन मांजाने कापला युवकाचा गळा
By admin | Published: January 15, 2017 1:37 AM