शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नायलॉन मांजाने पक्ष्यांवर संक्रांत

By admin | Published: December 27, 2015 10:36 PM

नायलॉन मांजाने पक्ष्यांवर संक्रांत

इंदिरानगर : मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने पक्ष्यांवर संक्रांत येत आहे. यावर्षीही सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. नायलॉन मांजावर बंदी फक्त कागदावरच दिसून येत आहे. मकरसंक्रांत पतंग उत्सव असून यात बालक, युवक, युवती सहभागी होतात. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश भरून जाते. बाजारात मांजा आणि पतंगाची लाखो रुपयांची उलाढाल होते. पतंग उत्सवात एकमेकांची पतंग कापण्यासाठी स्पर्धा सुरू असते. त्यासाठी सर्वांत चांगल्या दर्जाचा मांजा घेण्यात येतो. यामध्ये नायलॉनच्या मांजाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. परंतु या मांजामुळे दरवर्षी मोटारसायकलस्वाराच्या गळ्यास, अंगास व तोंडास गंभीर दुखापत होते. तसेच वृक्षांनाही मोठ्या प्रमाणात नायलॉनचा मांजा अडकतो. त्यामध्ये पक्षी अडकून बऱ्याच वेळेस जखमी होतात प्रसंगी मृत्यूही पावतात. त्यामुळे नायलॉनच्या मांजावर बंदी घालण्यात आली. परंतु काही दुकानदार नायलॉन मांजा हा ग्राहकांना लपूनछपून सर्रासपणे विक्री करीत आहेत. त्यामुळे तपासणीच्या वेळी नायलॉन मांजा काही सापडत नाही. त्याची चढ्या भावाने विक्री सुरूच आहे. (वार्ताहर)