नाशिक : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांचे पती तथा नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर केरू चुंभळे यांच्या विरोधात त्यांचे चुलते शांताराम पांडुरंग चुंभळे यांनी दहा विरुद्ध शून्य मतांनी अविश्वास ठराव पारीत केला. काकानेच पुतण्याचा पराभव केल्याचे या घडामोडीतून चित्र स्पष्ट झाले आहे.गेल्या ३ आॅक्टोबरला गौळाणे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर चुंभळे यांनी ठरलेल्या रोटेशननुसार अध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्या विरोधात गौळाणे विविध कार्यकारी संस्थेचे संचालक तथा त्यांचे चुलते शांताराम पांडुरंग चुंभळे यांच्यासह नऊ संचालकांनी बंड पुकारत अविश्वास ठराव आणण्यासाठी तालुका उपनिबंधक संजय गिते यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दहा संचालकांच्या स्वाक्षºया असल्याने तालुका उपनिबंधक संजय गिते यांनी मंगळवारी (दि.१०) गौळाणे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या १३ संचालकांना विशेष सभेची नोटीस बजावून तालुका उपनिबंधक कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी १३ पैकी दहा संचालक तालुका उपनिबंधक तथा अध्यासी अधिकारी संजय गिते यांच्या कक्षात हजर होते. यावेळी विद्यमान अध्यक्ष रत्नाकर केरू चुंभळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी शांताराम केरू चुंभळे यांनी सूचना आणली त्यास शिवराम दामू सहाणे यांनी अनुमोदन दिले. यावेळी उपस्थित दहा संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मदत केल्याने अध्यक्ष रत्नाकर चुंभळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारीत करण्यात आल्याचे अध्यासी अधिकारी संजय गिते यांनी जाहीर केले. त्यामुळे या अविश्वास ठरावाची नाशिक पंचायत समितीसह जिल्हा परिषदेत चर्चा होती.कुटुंबातील तिघे अनुपस्थितगौळाणे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर चुंभळे यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठराव सभेला स्वत: रत्नाकर चुंभळे यांच्यासह त्यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री रत्नाकर चुंभळे तसेच त्यांचे बंधू अर्जुन केरू चुंभळे अनुपस्थित होते.
माजी अध्यक्षांच्या पतीविरोधात अविश्वास मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:32 AM