लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : यंदा मान्सूनची सुरुवात चांगली झाली असून, जून महिन्याच्या पंधरवड्यात १०६ मिमी (९१ टक्के) पाऊस होऊन, सर्वाधिक पाऊस जातेगाव मंडळात १३९ मिमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला असून, वेहेळगाव मंडळातील आमोदे, बोराळे व वेहेळगाव परिसरात पेरण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.नांदगाव कृषी विभागाच्या वतीने ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पीकनिहाय सरासरी क्षेत्र (नियोजित पेरणी क्षेत्र) पुढीलप्रमाणे आहे. खरीप ज्वारी ६५ (९५), बाजरी २२,५०० (२१,५००), मका ३३ हजार (४,३५,०००),तूर ७५ (१००), मूग उडीद ६०० (दोन हजार), भुईमूग ८०० (१५००), कापूस १२ हजार (११ हजार), इतर १८०० (७८०).गेली काही वर्षे शेतकरी स्थानिक पारंपरिक पिकापासून दुसरीकडे वळत असल्याचे चित्र आहे. मका, बाजरी, खरीप, कांदा, मूग या पिकांच्या लागवडीकडे कल वाढत आहे. कपाशीचे पीक २२ ते २५ हजार हेक्टरपर्यंत लागवड होत असे; मात्र त्यात गेली काही वर्षे सातत्याने घट होताना दिसून येत आहे. मक्याचे क्षेत्र प्रत्येक वर्षी वाढत आहे. तालुक्यात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वातावरणात ही शेतकरी उत्साहाने पेरणीच्या मागे लागले आहेत. तालुक्यात ८५ ते ९० कृषी सेवा केंद्रे असून, त्यांच्याकडे सर्व प्रकारची बियाणे व रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कृषी विभागाने गतिमान पावले उचलून, बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविलेआहेत. वीस वीस शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांची मागणी नोंदवून बांधावर खत उपलब्ध करून दिल्याने केंद्रांवर गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे. जूनच्या दुसºया आठवड्यापर्यंत २८ कृषी सहायकांमार्फत ८५७८ शेतकऱ्यांना ३०१८ टन रासायनिक खत व ७९४ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. किमान पाच शेतकरी एकत्र येऊन त्यांनी मागणी नोंदविली तर बांधावर एमआरपीप्रमाणे खत, बियाणे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या वाहतुकीची बचत होईल. शेती शाळांमधून उत्पन्नवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानएमआरईजीएस शेतकºयांच्या शेतात त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कंपोस्ट टाकी, फळ पीक लागवड करण्यात येत आहे. आज ९५ कामे मंजूर असून, १३३६ मनुष्य दिवस निर्माण होतील अशी कामे मंजूर आहेत. १६ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू आहे. पीक प्रात्यक्षिक अंतर्गत मका पिकाचे १५ प्रकल्प, बाजरीचे ११ प्रकल्प, मुगाचे ३ व ज्वारीचे ४ प्रकल्प घेण्यात आले आहेत. नांदगाव, मनमाड व न्यायडोंगरी येथील मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ शेती शाळांमधून उत्पन्नवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वेळोवेळी पोहोचविले जात आहे.तणनाशक पाण्यात मिसळून पाठीवरच्या पंपाच्या साहाय्याने मका पीक पेरणीनंतर लगेच जमिनीवर फवारावे. बरेच शेतकरी हे तणनाशक युरिया- मध्ये मिक्स करून जमिनीवर धुरळतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे युरिया, तणनाशक पावडर व मजुरी वाया जाते व तण नियंत्रण होत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बीबीएफ यंत्राद्वारे मका व रासायनिक खते यांची पेरणी करावी.- जगदीश पाटील,कृषी अधिकारी, नांदगाव
नांदगाव तालुक्यात ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट, शेतीकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:50 PM
नांदगाव : यंदा मान्सूनची सुरुवात चांगली झाली असून, जून महिन्याच्या पंधरवड्यात १०६ मिमी (९१ टक्के) पाऊस होऊन, सर्वाधिक पाऊस जातेगाव मंडळात १३९ मिमी झाला आहे. त्यामुळे तालुक्यात पेरणीच्या कामांना वेग आला असून, वेहेळगाव मंडळातील आमोदे, बोराळे व वेहेळगाव परिसरात पेरण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
ठळक मुद्देबळीराजा व्यस्त : जातेगाव मंडळात सर्वाधिक १९९ मिमी पाऊस, मका क्षेत्रात वाढ शक्य