शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

अंबड लिंकरोडच्या अतिक्रमणाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:10 AM

सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली.

सातपूर : सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली. दरम्यान, महापालिकेने नोटिसा बजावल्यानंतर ७० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या वतीने येथील ६५३ पैकी २३० दुकाने वापरातील बदलामुळे सील करण्यात येणार आहे.सातपूर-अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारातील सर्व्हे नंबर ४४० आणि ४४३ मध्ये अनधिकृत भंगार व्यवसाय, अनधिकृत बांधकामे वाढत गेल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र या व्यावसायिकांनी परत अतिक्रमण केल्याने पुन्हा पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेने या अतिक्रमणावर हातोडा टाकला होता. त्यानंतर महानगरपालिकेने ठिकठिकाणी फलक लावून पुन्हा बेकायदेशीर व्यवसाय, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करू नये, असे सूचित केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष करून या जागेवर पुन्हा विनापरवाना अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत.महापालिकेने अतिक्रमण हटविण्याची पूर्वतयारी केली असून, त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बोधिशरण सोनकांबळे, उपायुक्त जयश्री सोनवणे, कार्यकारी अभियंता राजू आहेर, उद्धव धर्माधिकारी, पी. बी. चव्हाण, सतीश हिरे, विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, अनिल नरसिंगे, सोमनाथ वाडेकर, रवींद्र धारणकर, एस. आर. पाटील, नितीन नेर, महेंद्र पगारे, सुभाष आहेर, संजय अग्रवाल, कैलास भागवत आदी वरिष्ठ अधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात डिमार्केशन केलेल्या अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामांची पाहणी केली.खासगी एजन्सी ठेवणार नजरमहापालिकेच्या ताज्या सर्वेक्षणानुसार चुंचाळे शिवारात ६५३ बेकायदेशीर भंगार दुकाने असून, अनेकांनी वापरात बदल केला आहे अशा २३० दुकानांना सील करून त्यांचा वापर बंद करण्यात येईल तसेच त्यांच्याकडून हमी घेण्यात येईल, उर्वरित ४२३ दुकाने मात्र हटविण्यात येणार आहे. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव आहे. त्यामुळे अतिक्रमण करणाºयांवर त्याच वेळेस कारवाई करण्यात येणार आहे. शहरात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच करण्यात येणार आहे.महापालिकेने २३५ अनधिकृत बांधकामांवर आणि १३५ बेकायदेशीर व्यवसायांवर डिमार्केशन करण्याची कार्यवाही केली आहे२३५ अनधिकृत बांधकामे पाडण्यात येणार असून, १३५ बेकायदेशीर व्यवसाय सील करण्यात येणार आहे.सदर भंगार बाजारातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई सोमवार, दि. २६ रोजी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका