लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे.नवीन पॉप अप सायकल ट्रॅक चालविताना त्यात अडथळे दूर करण्यावर भर देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २८) हॅण्डल बार सर्वेक्षण करण्यात आले.त्र्यंबक नाका ते पपया नर्सरी हा पॉप सायकल ट्रॅक असून, त्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.स्ट्राव्हा या अॅपच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करताना अशोक स्तंभ ते पपाया नर्सरी आणि तेथून पुन्हा अशोक स्तंभ हा १६ किलोमीटरचा मार्ग निवडण्यात आला होता.स्मार्ट रोडवरील डेडीकेटेड सायकल ट्रॅक असल्याने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान नाका सायकल चालविण्यास अडथळा आला नाही. त्र्यंबक नाक्यावर सिग्नल वरून वळण घेणे अवघड आहे.रस्त्यावर खड्डे असल्याने चालविण्यासदेखील अडथळे येत होते, असे सर्वेक्षणात आढळून आले. या मोहिमेत स्मार्ट सिटीचे अधिकारी, कर्मचारी व नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचे सदस्य सहभागी झाले होते.उभ्या असलेल्या वाहनांची अडचणत्र्यंबकनाका ते पपया नर्सरीदरम्यान रहदारी आणि भरधाव गाड्यांमुळे सायकल चालविण्यास अडचण येते. अनेक ठिकाणी वाहनेविरुद्ध दिशेने येतात. रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि चारचाकी उभ्या केलेल्या असल्याने सायकल चालवण्यास त्रास होतो. मायको सर्कल येथे सायकलसह रस्ता ओलांडणे फारच अवघड आहे, तेथे सायकलवरून उतरूनच रस्ता ओलांडावा लागतो.
जाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:24 PM
नाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे.
ठळक मुद्देस्मार्ट सिटी अधिकारी, कर्मचारी व सायकलिस्ट फाउण्डेशनचा सहभाग