शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मुख्यमंत्र्यांचे निमित्त झाले  अन् दोन विरोधक एकत्र आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:57 AM

एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून  दर्शवून दिले आहे. यास बनकर आणि कदम हे तरी अपवाद का ठरावेत? हे दोनही विरोधक एकत्र  आले, चर्चाही झाली. निमित्त होते... मुख्यमंत्री ठाकरे यांचे ओझर विमानतळावरील स्वागताचे!

ठळक मुद्देओझरला ठाकरे यांच्या स्वागतासाठी बनकर, कदम यांची उपस्थिती

ओझर : एरव्ही, एकमेकांवर राजकीयदृष्ट्या कुरघोड्या करण्याची एकही संधी न दवडणारे दोन कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर येणे, ही तशी अवघड गोष्ट. परंतु, राजकारणात सर्वकाही शक्य असते, हे राज्यातील विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून  दर्शवून दिले आहे. यास बनकर आणि कदम हे तरी अपवाद का ठरावेत? हे दोनही विरोधक एकत्र  आले, चर्चाही झाली. निमित्त होते... मुख्यमंत्री ठाकरे यांचे ओझर विमानतळावरील स्वागताचे!शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी ओझर विमानतळावर काही काळ थांबले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी  आमदार दिलीप बनकर व माजी आमदार  अनिल कदम  उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी विमानतळावर असलेल्या एका कक्षात छोटेखानी बैठक घेतली.  वीजबिलांबाबत थकबाकी ७० हजार कोटींच्या वर गेली असल्याने त्यावर गंभीर चर्चा झाली. द्राक्षांबाबत केंद्राने सबसिडी बंद केल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, त्यावर ठाकरे यांनी याविषयी केंद्राकडे तातडीने शिफारस करणार असल्याचे सांगितले. कांद्याच्या भावाला लागलेली गळती बघता त्यावर तोडगा काढण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असेही ठाकरे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. कदम यांनी ओझर नगर परिषद व्हावी, यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केले. त्याचाच दाखला देत मुख्यमंत्र्यांनी आता ओझर नगर परिषदेला रुरल मॉडेल सिटी बनवून दाखवा. त्यासाठी मी खंबीरपणे पाठीशी आहे, असे सांगितल्याने ओझरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, नसतील तरच नवल!सकारात्मक संदेशस्थानिक पातळीवर एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणारे कदम आणि बनकर हे दोन्हीही  सत्ताधारी गटाचे झाल्याने या दोघांचेही नेते राज्याचे प्रमुख आहेत. त्याचा प्रत्यय अनेकवेळा मुंबई-नाशकात आला असला तरी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोघांना सोबत घेत वीज, कोविड, शेतमाल हमीभाव, कांदा, द्राक्षे संकट अशा विविध विषयांवर चर्चा केल्याने या एकत्रीकरणाचा सर्वत्र सकारात्मक संदेश जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Kadamअनिल कदम