शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

आॅक्टोबर हिट : नाशिककरांना उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 4:29 PM

रविवारी (दि.७) सकाळपासून ऊन तापले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आॅक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. आॅक्टोबर महिना हा हिवाळ्याची चाहूल देणारा ठरतो; मात्र अद्याप किमान तपमानाचा पाराही वीस अंशावर असून दिवसा ऊन व रात्री उकाडा असा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे.

ठळक मुद्देकमाल तपमानाचा पारा ३३ अंशापार बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम यंदा गुलाबी थंडीचे आगमन लांबणार

नाशिक : आठवडाभरापासून नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा अनुभवयास येत आहे. कमाल तपमानाचा पारा ३३ अंशाच्यापुढे सरकला असल्याने उकाडा वाढला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा व रात्रीदेखील वाऱ्याचा वेग मंदावलेला राहत होता. त्यामुळे उकाडा असह्य होऊ लागला आहे.रविवारी (दि.७) सकाळपासून ऊन तापले होते. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. आॅक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा नाशिककरांसाठी चांगलाच तापदायक ठरला. आॅक्टोबर महिना हा हिवाळ्याची चाहूल देणारा ठरतो; मात्र अद्याप किमान तपमानाचा पाराही वीस अंशावर असून दिवसा ऊन व रात्री उकाडा असा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. रविवारी दिवसभार वा-याचा वेग काहीसा टिकून राहिल्याने दिलासा मिळाला; मात्र काही भागात वा-याचा वेग अत्यल्प राहिल्याने उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. संध्याकाळी वातावरणात गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा नाशिककरांकडून केली जात असली तरी तीन ते चार दिवसांपासून संध्याकाळीही वातावरणात उष्मा राहत असल्याने उकाड्याचा त्रास वाढत आहे.

आॅक्टोबर महिन्याचा प्रारंभच तापदायक झाला. कारण सोमवारी (दि.१) कमाल तपमानाचा उच्चांक नोंदविला गेला. यादिवशी पारा ३४.१ अंशावर पोहचला होता. संपुर्ण आठवडाभर पारा तीशीच्यापूढेच स्थिरावत असल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. किमान तपमानाचा पाराही वीस अंशाच्या जवळपास राहत आहे. सकाळच्या सुमारास काही दिवस धुकेही दाटून आले होते. यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा गुलाबी थंडीचे आगमन लांबणार असल्याचे चिन्हे आहेत. सध्या वातावरणासोबत ऋूतूमानातही बदल जाणवू लागला आहे.दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने नागरिकांनी रविवारी सुटीच्या दिवशीही घराबाहेर पडणे टाळले. संध्याकाळी सहा वाजेनंतर शहरातील बाजारपेठांमध्ये काही प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी शीतपेय, थंड पाणी, आईस्क्रीम, कुल्फीला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे; मात्र थंडपदार्थांचे सेवन सर्दी-पडसे, घसा खवखवणे यासारख्या शारिरिक तक्रारींना कारणीभूत ठरु शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघातNashikनाशिकTemperatureतापमान