सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली ती ११ वाजेपर्यंत रिमझिम सुरूच होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीमुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. दिवसभरात तालुक्यात २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खळ्यात रचून ठेवलेल्या भाताची सुडी प्लॅस्टिकने झाकण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली होती. पळसन येथे मांडव कोसळून कारल्याची संपूर्ण वेल जमीनदोस्त झाली आहे. खळ्यात मळणीकरिता रचून ठेवलेला भात, खुरसणी, उडीद, कुळीथ, वरई, तूर, नागली तसेच बोरगाव परिसरातील टमाटे, स्ट्रॉबेरी, देवलदरी, करंजूल, गांडोळमाळ या भागात कारल्याच्या बागांचे मांडव वादळी वाºयामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी हा कोरडवाहू शेतकरी आहे म्हणून पावसाच्या भरोशावर जेमतेम पिकलेली शेती या पावसाने भिजली आहे.पावसात ओला झाल्याने तांदूळ काळा पडत असून, धानाला भाव मिळत नाही त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. घाटमाथ्यावरील बोरगाव, घोडांबे, घागबारी, वडबारी, उंबरपाडा, सराड, साजोळे, हिरीडपाडा या भागातील स्ट्रॉबेरी या पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. घाटमाथ्यावरील शेतकरी दरवर्षी स्ट्रॉबेरी पिकाचे ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळत होते. पावसामुळे खूपच नुकसान झाले आहे. अर्ध्या एकरावर स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. रोपे महाबळेश्वर येथून आणली आहेत. प्रतिरोप जागेवर पंचेचाळीस रुपये नगाने खरेदी करून वाहतूक खर्च, लागवड, खते, औषधे फवारणी आदींसह पन्नास ते साठ हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र वादळ व पावसाने नुकसान झाले आहे. या पावसामुळे काळा तांबेरा या रोगाला बळी पडून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र यामुळे अपेक्षा धुळीस मिळाली आहे. कृषी विभागाने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा.- किसन भोये, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, सराड
ओखीचा तडाखा : नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट भाताचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:02 PM
सुरगाणा : ओखी वादळामुळे आलेल्या पावसाने तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून, भात धानासह नागली, तूर, टमाटा, स्ट्रॉबेरी तर पळसन परिसरातील कारल्याची संपूर्ण वेल भुईसपाट झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली ती ११ वाजेपर्यंत रिमझिम सुरूच होती. ...
ठळक मुद्देभाताचे नुकसानओखीचा तडाखा नागली, तूर, स्ट्रॉबेरी, टमाटा, कारली भुईसपाट