शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

आरोग्याधिकारी डेकाटेंविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:56 AM

नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय नथूजी डेकाटे यांच्या विरोधात दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. १५) भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय नथूजी डेकाटे यांच्या विरोधात दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. १५) भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार २०१६ पासून जिल्ह्यात तालुक्याचे आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. आॅक्टोबर २०१८ पासून त्यांची वेतनवाढ कमी आकारण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी डेकाटे यांची भेट घेऊन पगारवाढीबाबत सांगितले. (पान ३ वर)यावेळी डेकाटे यांनी त्या मोबदल्यात २५ हजार रु पयांची लाचेची मागणी केली. तक्र ारदारानेही ५ हजार रुपये काढून देत उर्वरित रक्कम नंतर देण्याचा बहाणा करून काढता पाय घेतला. त्यानंतर तक्र ारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार केली. दरम्यान, दहा हजार रुपयांची तडजोड करण्यात आली. हा सर्व प्रकार विभागाच्या पंचासमोर घडला. याबाबतचे ध्वनिमुद्रण केले गेले. मात्र याबाबतची कुणकुण लागल्याने डेकाटे यांनी रक्कम स्वीकारली नाही. मात्र वेतनवाढीच्या मोबदल्यात लाचेच्या स्वरूपात रक्कम मागितल्याचे सिद्ध झाल्याने संशयित डेकाटेंविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेनंतर डॉ. डेकाटे पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.तक्र ारीनुसार विभागाने शहानिशा करण्यासाठी सापळा रचला. तक्रारदार यांच्या खिशात ‘व्हाइस रेकॉर्डर’ ठेवून त्यांना डेकाटे यांच्या दालनात पाठविण्यात आले. यावेळी दुसºया तालुक्याचे अधिकारी डेकाटे यांच्याशी चर्चा करत होते तरीदेखील डेकाटे यांनी वेतनवाढ वाढविण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी यावेळी तक्रारदाराकडे केली.म्हणे, खासगी कामानिमित्त बाहेरगावीडेकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी तत्काळ १ जूनपासूनच खासगी कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे कारण सांगून रजा घेतली. यापूर्वी डेकाटे हे महापालिकेत वादग्रस्त अधिकारी ठरले होते. त्यानंतर डेकाटे यांना जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्याबाबत सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला गेला होता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डेकाटे यांची दोन महिने विलंबाने नियुक्ती केली होती.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी