शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

पदाधिकारी मुलाखतींना वादाची झालर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:36 AM

नाशिक : शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी पदाधिकारी नियुक्त करण्याच्या दृष्टीने रविवारी (दि़८) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ तथापि अनेक जुन्या-जाणत्यांना याबाबत माहिती मिळाली नव्हती, तसेच अनेक विधानसभा निवडणुकीच्या दावेदारांनी आपले समर्थक पाठवून त्यांची पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यासाठी खेळी केल्याने हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला़आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल करण्यास ...

ठळक मुद्देशिवसेनेची बैठक ज्येष्ठ नेत्यांना माहिती न मिळाल्याने नाराजी

नाशिक : शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी पदाधिकारी नियुक्त करण्याच्या दृष्टीने रविवारी (दि़८) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या़ तथापि अनेक जुन्या-जाणत्यांना याबाबत माहिती मिळाली नव्हती, तसेच अनेक विधानसभा निवडणुकीच्या दावेदारांनी आपले समर्थक पाठवून त्यांची पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यासाठी खेळी केल्याने हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला़आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक बदल करण्यास प्रारंभ केला आहे़ त्याअंतर्गत महानगरप्रमुखपदी सचिन मराठे व महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या दोघांकडे शहरातील चार पैकी दोन-दोन विधानसभा मतदारसंघ विभागून दिलेआहेत़ त्यापैकी पूर्व आणि पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी नियुक्त करण्यासाठी रविवारी मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊलाल चौधरी यांनी मुलाखती घेतल्या़ या मुलाखतींची पूर्वतयारी करण्यात आली असली तरी इच्छुकांनी या मुलाखतीस उपस्थित रहावे याबाबतचे आवाहन केवळ पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून करण्यात आले़ यामुळे सर्व कार्यकर्त्यांपर्यंत हा संदेशपोहोचला नाही, अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे़ पक्षात ज्यांनी येऊन काम करावे अशा कार्यकर्त्यांना बोलविण्याबाबत कोणताही पुढाकार घेतला नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे़विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी आपल्या समर्थकांनाच या मुलाखतीसाठी पाठविले होते़ मुलाखत देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांवर महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचे नाराज गटाचे म्हणणे आहे़ विशेष म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडून दुसºया पक्षात असलेल्या एका पदाधिकाºयाच्या समर्थकांचा मुलाखत देणाºयांमध्ये अधिक भरणा असल्यामुळे हीदेखील चर्चेची बाब ठरली़पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख नीलेश कुलकर्णी हे या मतदारसंघातून निवडणूकीसाठी इच्छूक असल्याचे सागिंतले जाते़ त्यामुळे चौध२रींसमोरच पक्षाची स्थिती व नाराजीबाबत कसे बोलणार असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते़ त्यामुळे या मुलाखतींवर बहिष्कार टाकल्याचे काही कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले़शिवसेनेच्या संघटनवाढीसाठी तसेच कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेण्यासाठी इच्छूक तसेच कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते़ मात्र, अशा प्रकारे मुलाखती झाल्याने यातील काही कार्यकर्त्यांनी मुंबईतील नेत्यांशी संपर्क साधण्याची तयारी सुरू केली आहे़आगामी निवडणुकांच्या संदर्भात पदाधिकारी नियुक्ती तसेच कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे संदेश पाठविण्यात आले होते़ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मुलाखतीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली असून, पक्षातील पदे देण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील़ यावेळी काही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी पक्षाने तिकीट न दिल्याने अपक्ष लढलेल्या शिवसैनिकांना पक्षातून न काढता त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करण्याची विनंती केली़- सचिन मराठे, महानगरप्रमुख, शिवसेना

टॅग्स :Politicsराजकारण