नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अवघ्या तासाभरात महापालिकेच्या महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांची वाहने आयोगाने जमा केली आहेत. महापौरांच्या निवासस्थानापासूनच त्यांचे वाहन ताब्यात घेऊन ते महापालिकेत जमा करण्यात आले, तर अन्य पदाधिकाºयांनीदेखील आपली वाहने जमा केली आहेत. दरम्यान, आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे महापालिकेची अनेक महत्त्वपूर्ण कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली असून, त्यामध्ये बससेवा, प्रोजेक्ट गोदा आणि फाळके फिल्मसिटी यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे पालिकेतील पदाधिकाºयांची वाहने तातडीने जमा करण्यात आली आहेत. रविवारी सकाळपासूनच आचारसंहिता जाहीर होणार असल्याची चर्चा असल्याने प्रत्यक्ष निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच महापालिकेच्या पदाधिकाºयांनी महत्त्वाची कामे उरकून घेत आपली वाहने जमा केली. महापौर रंजना भानसी यांचे वाहन पंचवटीतील त्यांच्या निवासस्थापासून दुपारी ताब्यात घेण्यात आले. सदर वाहने ही महापालिकेच्या आवारात जमा करण्यात आली आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे पदाधिकाºयांना कोणताही धोरणात्मक आणि राजकीय निर्णय घेता येणार नाहीच याउलट यापूर्वीच मंजूर आणि जाहीर झालेल्या महापालिकेच्या अनेक विकासकामांवर याचा थेट परिणाम होणार आहे. महापालिकेच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांना यामुळे बे्रक लागणार असल्याने पुढील दोन महिने तरी अनेक महत्त्वपूर्ण कामे मागे पडणार आहेत.नाशिक महापालिकेचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समितीने गेल्या गुरुवारी (दि.८) महासभेत सादर केला होता. यापूर्वी आयुक्तांनी स्थायी समितीला १८९४ कोटी ५० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात ८९ कोटी रुपयांची भर टाकून स्थायी समितीने अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या कामांच्या निविदा निघू न शकल्याने आता आचारसंहितेमुळे ही कामे लांबणीवर पडली आहेत.राजकीय फलक काढण्यास सुरुवातनिवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अत्यंत तत्परतेने अंमलबाजवणीस सुरुवात केली आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर तासाभरातच पदाधिकाºयांची वाहने जमा करण्यास सुरुवात केली तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे जाहिरात फलक काढण्यासही सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच पदाधिकाºयांच्या वाहनांवरील पक्षीय नावे आणि चिन्हेही झाकण्यात आलीत.
तासाभरात पदाधिकाऱ्यांची वाहने जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 1:37 AM
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अवघ्या तासाभरात महापालिकेच्या महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांची वाहने आयोगाने जमा केली आहेत.
ठळक मुद्देनिवडणूक आचारसंहिता : शहरातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांनाही फटका