नाशिक : ओझर येथील नाशिक विमानतळावर हजेरी लावल्यानंतर आता गोत्यात येण्याची चिन्हे दिसू लागल्याने या पार्टीत सहभागी अनेक अधिकाऱ्यांनी आता ‘तिथे’ मी नव्हतोचचा पावित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्टीला दोेनशेहून अधिक जणांची उपस्थिती असल्याने आता नेमके हे अधिकारी व मक्तेदार कोण? असा प्रश्न पोलिसांबरोबरच सर्वसामान्यांना पडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील रजेवर गेलेल्या एका अधिकाऱ्याने आपली रजा पूर्वनियोजित होती, आपण ओझर विमानतळावरील साग्रसंगीत पार्टीला उपस्थित नव्हतो. सार्वजनिक बांधकाम विभागात आयोजित केलेल्या निरोप समारंभाला मात्र उपस्थित असल्याची कबुली या अधिकाऱ्यांनी देत हा शासकीय कार्यक्रम असल्यानेच आपण उपस्थित असल्याचे स्पष्ट केले आहे. रजेवर असलेल्या या अधिकाऱ्याने काल (दि. ६) जिल्हा परिषदेत धाव घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपण त्या पार्टीत नसल्याबाबत लेखी स्वरूपात कळविल्याचे समजते. जिल्हा परिषदेच्या कनेक्शनबाबत मात्र पदाधिकारी व सदस्यांमध्ये कालही दबक्या आवाजात चर्चा सुरूच होती.
अधिकाऱ्यांनी घेतला ‘तिथे’ मी नव्हेचचा पावित्रा ओझर पार्टी : अनेकांची बचावासाठी धडपड सुरू
By admin | Published: February 07, 2015 1:04 AM