शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदाची अधिकृत घोषणा नाशिकमध्येच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST

नाशिक : नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत ...

नाशिक : नाशिकला होणाऱ्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी राज्यातील महामंडळाच्या सर्व संस्था जी नावे सुचवतील, त्या सर्व नावांबाबत २३ जानेवारीला नाशिकमध्ये महामंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर निवडीची घोषणा नाशिकमध्येच २४ जानेवारीला अधिकृतरित्या करण्यात येणार आहे.

दरवर्षी संमेलनाध्यक्ष निवडीची विशिष्ट प्रक्रिया साहित्य महामंडळाने निश्चित केली आहे. त्यात माजी संमेलनाध्यक्ष यांच्याकडून एक नाव सुचवले जाते, तर नाशिकच्या निमंत्रक संस्थेकडूनदेखील एक नाव सुचवले जाते. त्याशिवाय महामंडळाच्या देशभरातील १० संस्थांकडून संमेलनाध्यक्ष निवडीबाबत त्या भागातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या नावाची निवड करण्यात येते. ही सर्व नावे विशिष्ट कालावधीत बंद लिफाफ्यातून महामंडळाकडे येत असतात. या सर्व संस्था वेगवेगळी नावे सुचवू शकतात किंवा काही संस्था सारखीच नावे सुचवू शकतात. या सर्व नावांचे लिफाफे साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वांसमक्ष उघडले जातात. त्यातील साहित्यिकांच्या नावांवर गांभीर्यपूर्वक चर्चा केली जाते. त्या चर्चेतून मग साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड केली जाते. हीच महामंडळाची निर्धारित पद्धत असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. या पद्धतीनुसारच यंदादेखील महामंडळाच्या सर्व विभागीय शाखांकडून नावे मागविण्यात आलेली आहेत. ती नावे २१ तारखेपर्यंत नाशिकला पोहोचतील. त्यानंतर २३ तारखेला साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यात सर्व नावांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात येईल. त्यातून सर्वोत्तम साहित्यिकाच्या नावाची निवड करून त्याची घोषणा २४ जानेवारीला नाशिकमध्येच करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.

इन्फो

ऐनवेळी कलाटणीचीही परंपरा

साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदांबाबत ज्या नावांची चर्चा होते, तसेच जी नावे प्रचंड चर्चेत असतात त्या नावांचा केवळ उल्लेख करून त्याकडे दुर्लक्ष केले जाण्याचीदेखील महामंडळाची परंपरा आहे. त्यामुळे जे नाव एखाद्याच विभागीय कार्यालयाने सुचविलेले असते, त्याच नावावर शिक्कामोर्तब केले जाते किंवा निमंत्रक संस्थेने सुचविलेल्या नावावरही पसंतीची मोहोर उठविली जाते. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनात महामंडळ चर्चेतील नावाला पसंती देते की, सोयीस्कर कलाटणीची परंपरा पाळली जाते, हे पाहणेदेखील औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

लोगो

या बातमीला साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.