ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपुर ग्रामपंचायतीला विविध अधिकारी वर्गाने भेट दिली याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली. विकासासाठी गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शासन स्तरावरून येणारी प्रत्येक योजना गावात राबविली गेली पाहिजे त्यातूनच गावाची उन्नती घडून येईल शेवटच्या स्तरापर्यंत शासनाच्या विकास योजना पोहोचतील व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल होईल.सोमपूर गावाचे भूमिपुत्र गटविकास अधिकारी महेश पाटील त्यांचे समवेत मॅजिस्ट्रेट संदीप पवार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक प्रशांत परदेशी, नंदुरबारचे पोलीस उप अधीक्षक सचिन हिरे, मालेगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद शिरोदे, उद्योजक संदीप मांडवडे, लेखापाल विष्णू वारुंगसे या सर्व अधिकाऱ्यांनी सोमपूर गावाला भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सरपंच सुनीता गायकवाड, उपसरपंच समाधान मोरे, ग्रामपंचायत सदस्य, गिरीश भामरे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक भामरे, माजी सरपंच प्रकाश भामरे, सचिन भामरे, उखाजी पाटील, पोलीस पाटील महेंद्र भामरे, विजय नहिरे, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष शिंदे, केशव सोनवणे, संभाजी भामरे हे उपस्थित होते.
सोमपुर ग्रामपंचायतीला अधिकाऱ्यांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:04 PM
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपुर ग्रामपंचायतीला विविध अधिकारी वर्गाने भेट दिली याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली. विकासासाठी गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शासन स्तरावरून येणारी प्रत्येक योजना गावात राबविली गेली पाहिजे त्यातूनच गावाची उन्नती घडून येईल शेवटच्या स्तरापर्यंत शासनाच्या विकास योजना पोहोचतील व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल होईल.
ठळक मुद्देशासन स्तरावरून येणारी प्रत्येक योजना गावात राबविली गेली पाहिजे