नाशिक : गंगापूर धरण व समूहात दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे दिसू लागताच, शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन कश्यपी धरणातील पाणी सोडण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला. महापालिकेने धरणाच्या पाण्याची जबाबदारी नाकारली असून, ज्यांच्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत मगच पाणी सोडावे, अशी भूमिका घेत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या गेटवरच अडवून ठेवण्यात आले. अखेर प्रकल्पग्रस्तांशी सोमवारी बैठक घेण्याचे मान्य करत पाणी न सोडताच, पाटबंधारे व पोलीस खाते माघारी परतले.सध्या गंगापूर धरणात ३३ टक्के पाणी असून, धरण समूहात ४५ टक्के जलसाठा आहे. त्यातील कश्यपी धरणात १६७९ दशलक्ष घनफूट म्हणजे ९१ टक्के पाणी अद्यापही कायम आहे. कश्यपी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत धरणातील पाणी सोडू नये अन्यथा धरणग्रस्त धरणात उड्या घेतील, अशी धमकी प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. त्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकाºयांनीदेखील सकारात्मकता दर्शवून धरणातील पाणी सोडण्यात येणार नाही, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले आहे. असे असतानाही शनिवारी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे खात्याचे मिसाळ, तांदळे या अधिकाºयांनी हरसूल पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त घेऊन कश्यपी धरणाचे पाणी सोडण्यासाठी दाखल झाले.प्रकल्पग्रस्त गेल्या वीस वर्षांपासून विविध मागण्यांसाठी लढा देत असून, एकही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा परिस्थितीत बळाचा वापर करून पाणी सोडण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थ थेट धरणात उड्या घेतील, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आल्यावर धरणावर आलेल्या अधिकाºयांनी पाणी सोडण्यास नकार दिला.
पाणी सोडण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना पिटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 1:01 AM
गंगापूर धरण व समूहात दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची चिन्हे दिसू लागताच, शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस फौजफाटा घेऊन कश्यपी धरणातील पाणी सोडण्याचा प्रयत्न प्रकल्पग्रस्तांनी हाणून पाडला.
ठळक मुद्देकश्यपी प्रकल्पग्रस्त आक्रमक : सोमवारच्या बैठकीनंतर निर्णय